Subscribe Us

header ads

गुटखा गायब करणे आले अंगलट; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित

बीड स्पीड न्यूज 


गुटखा गायब करणे आले अंगलट; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित


बीड|प्रतिनिधी-: गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनीच त्यातील २३ पोटे गुटखा गायब केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर आणि दोन अंमलदारांना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटख्याच्या अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र अनेक ठिकाणी गुटख्या व्यापाऱ्यांना पोलिसांचेच अभय असल्याची चर्चा सातत्याने होत असते. त्याचा प्रत्यय आता पाटोदा येथील कारवाईत आल्याचे दिसत आहे. ४ दिवसापूर्वी केजचे सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पाटोदा परिसरात गुटख्यावर कारवाई केली होती. त्यांनी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना गुटख्याच्या कंटेनरची माहिती देऊन तो अडवायला सांगितले होते. मात्र पोलिसांनी तो अडवल्यानंतर त्यातील ५० पोत्यापैकी २३ पोते गुटखा हुले कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात उतरवला आणि केवळ कारवाईत केवळ २७ पोते गुटखा दाखविला. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सहायक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस संतोष क्षीरसागर आणि कृष्ण डोके यांना निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबन आदेशातच हे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. दरम्यान, कोळेकरांना नियंत्रण कक्ष तर दोन्ही अंमलदारांना पोलीस मुख्यालयात नियमित हजेरी बंधनकारक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. विक्रीसाठी बंदी करण्यापेक्षा उत्पादनावर बंदी करावी !

    उत्तर द्याहटवा

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा