Subscribe Us

header ads

गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील गावाना सावधानतेचा इशारा सायंकाळी 6 वाजेपासून 9432 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

बीड स्पीड न्यूज 



गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील गावाना सावधानतेचा इशारा सायंकाळी 6 वाजेपासून 9432 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग

बीड|प्रतिनिधी  दि. 25  जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामूळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांव्दारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणी पातळी वाढत आहे.त्यामुळे आज 25 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून धरणाच्या गेटमधून सांडव्याव्दारे गोदावरी नदी पात्रामध्ये 9432 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, असे पुर नियंत्रण कक्ष, जायकवाडी प्रकल्प, पैठण यांनी कळविले आहे. तसेच पाण्याची आवक लक्षात घेऊन  विसर्ग  कमी / जास्त करण्यात येणार आहे. तरी गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी व तत्सम साहित्य इ. तात्काळ काढून घेण्याबाबत तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही. याबाबत उक्त गावंना तात्काळ सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा