Subscribe Us

header ads

बदनापूर नगरपंचायतचे विकासाकडे दुर्लक्ष सर्वत्र घाणीचे साम्राज्य लोकांचे आरोग्य धोक्यात


बीड स्पीड न्यूज 


बदनापूर नगरपंचायतचे विकासाकडे दुर्लक्ष सर्वत्र घाणीचे साम्राज्य लोकांचे आरोग्य धोक्यात

बदनापुर / प्रतिनिधी / शहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच  शाईनगर व मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे व चिखलामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दोन  वर्षातील नगर पालिकेच्या  या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त  झाले आहेत. बदनापुर नगर पालिकेचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नाही. सौ .मंगलताई जगन्नाय बारगाजे अध्यक्षपदी निवडल्यानंतर कांहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने बदनापुरकर  होत्या. मात्र, सौ बारगाजे यांच्या सत्तेचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर शहराची परिस्थिती पहिल्या सारखीच बकाल झाली आहे. साध्या मुलभुत गरजा पुरविण्यात देखील नगरपंचायतला अपयश आले. दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी डॉ .  पल्लवी अंभोरे यांची बदली झाल्यानंतर बदनापुर  नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुधिर  गवळी यांच्याकडे येथील प्रभार आला आहे. मात्र, ते  परतुर व बदनापुर   कार्यालयाचे कामगाज पाहत आहे पदभार घेतल्या पासुन मुख्यधिकारी केव्हा नगर पंचायतला येतात व केव्हा जातात हे मात्र कळेना शहरभर घाणीचे साम्राज्य मुख्य रस्त्यासह गल्लीबोळांमध्ये जागोजागी  चिखल ,कच-यांचे ढिगारे साचलेले आहेत. नाल्या तुंबलेल्या असुन घाण पाणी रस्त्यांवरुन वाहात आहे. साचलेले कच-याचे ढिगारे उचलणे, नाले सफाई व पाईपलाईन लिकेज काढण्यात नगरपंचायत असमर्थ ठरत आहे. यामुळे डासांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून शहरात साथीचे रोग वाढले आहेत. याबाबत येथील मुख्याधिकारी गवळी यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. सफाई कर्मचा-यांवर होतो लाखोंचा खर्च नगरपंचायतची आर्थिक परिस्थिती डामाडौल असतांना कायम व रोजंदारी कर्मचा-यांवर नगरपंचायत दर महिन्याला लाखोरुपयांचा खर्च करते. कायमस्वरुपी  रांजंदारीवरीलअसे कर्मचारी सफाई व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. असे असतानाही केवळ प्रशासकीय नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे. असा आरोप सौ . पुजा संदिप टेहरे  शिवसेना महिला आघाडी शहरा प्रमुख यांनी केला आहे.

बदनापूर नगरपंचायतचे विकासाकडे दुर्लक्ष -सय्यद साजिद

बदनापूर शहरात नगरपंचायतकडून जवळपास १ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, मात्र वार्ड क्रमांक १३ मधील एका गल्लीचे मोजमाप करुन अंदाज पत्रक तयार करण्यात आले. परंतु दुसऱ्या गल्लीचे कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

नगरपंचायतकडून विकास कामे कमी अणि सर्वसामान्य जनतेला त्रास -ॲड. अकरमखान पठाण

बदनापूर नगरपंचायत हद्दीत एकुण १७  वार्ड असून, त्यापैकी काही वार्डात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. परंतु उर्वरित वार्डात विकास कामे मंजूर का करण्यात आले नाही? त्या वार्डात भाजचे नगरसेवक नाही म्हणून उर्वरित वार्डात विकास कामे मंजूर करण्यात आले नसल्याचे सुज्ञ नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. ही गोष्ट नागरिकांच्या समस्या वाढवणारी आहे. याकडे मुख्याधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष ॲड. अकरमखान पठाण यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा