Subscribe Us

header ads

नांदूर हवेली येथे रस्ता चिखलमय नागरिकांचे अतोनात हाल गाव सोडुन जाण्याचा वेळ

बीड स्पीड न्यूज 


नांदूर हवेली येथे रस्ता चिखलमय नागरिकांचे अतोनात हाल गाव सोडुन जाण्याचा वेळ


वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यात ग्रामीण भागातील विकासाचे तीन तेरा झाले आहेत रस्ता नसल्याने अनेक अपघात होत आहेत. कोणी वेळेवर दवाखान्यात पोहचत नाही लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात काम कोणी करत नाही आणि काही गावाला रोड 

मंजूर होऊन देखील काम पूर्ण होत नाहीत.अश्याच प्रकारे बीड तालक्यातील नांदूर हवेली येथील नागरिकांची रस्ता मुळे गाव सोडुन जाण्याची वेळ आली आहे. या गावात येणारा मुख्य रस्ता नुसता चिखलाने माखला आहे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. महिलांना पाणी घेऊन येता येत नाही सर्व दळण वळण बंद होत आहे मुख्य रस्ता चिखला 

ने माखल्याने अनेक गाड्या स्लीप होऊन पडत आहेत. अनेक वेळा निवेदन देऊन देखील कोणीही याची दखल घेत नाहीत आता या गावचे नागरिक संघर्ष करण्याचा विचार करत आहेत. तरी याची दाखल घेतं लवकरात लवकर रस्ता मंजुर करून काम पूर्ण करावे आहे अशी मागणी होत आहे. आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील असे बोलले जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा