Subscribe Us

header ads

बार्टीच्या मोफत स्पर्धा क्लासेसची चाळणी परीक्षा ३१ जुलैला होणार परीक्षा : राहूल वाघमारे

बीड स्पीड न्यूज 


बार्टीच्या मोफत स्पर्धा क्लासेसची चाळणी परीक्षा ३१ जुलैला होणार परीक्षा : राहूल वाघमारे


बीड /  प्रतिनिधी-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मान्यता प्राप्त सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून मोफत स्पर्धा क्लासेससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार 702 अर्ज दाखल झाले आहेत. या दाखल झालेल्या अर्जाची  चाळणी  परीक्षा येत्या 31 जुलैला होणार आहे. ही परीक्षा शहरातील शासकीय तंत्र निकेतन, खंडेवश्वरी मंदिराजवळ, नाथपूर रोड बीड येथे होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दोन दिवस आगोदर  परीक्षा ओळखपत्र घेऊन जावे. असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडून बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी तसेच पोलीस व मिलटरी भरतीपूर्व मोफत स्पर्धा कोचिंगसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंगसाठी) अर्ज मागविण्यात येत आहेत.सदरील मोफत स्पर्धा कोचिंग क्लासेसची चाळणी परीक्षा रविवार दि. 31 जुलै रोजी होणार आहे. सकाळी 10  वाजता बँक,रेल्वे, एल.आय.सी, लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या परीक्षेच्या एक तास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. याची  विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी केले आहे. काही अडचण असल्यास केंद्रप्रमुख यशवंत वावळकर 9766866868, सहाय्यक केंद्रप्रमुख प्रा.अविनाश वडमारे 9588467377, सचिन काकडे 9970221823 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सम्राट प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

बार्टीचे महत्वकांक्षी धोरण

पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा 6 हजार रूपये विद्यावेतन तसेच निःशुल्क वाचन साहित्यासाठी 5 हजार किमतीच्या पुस्तकांचा संच व ऑनलाईन स्टडी साहित्य संस्थेकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती सम्राट प्रतिष्ठान संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सचिव राहुल वाघमारे यांनी दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा