Subscribe Us

header ads

माणुसकीच्या मूल्यातून वृक्षांची जपवणूक; वाढदिवस निमित्त अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणाचा उपक्रम

बीड स्पीड न्यूज 

माणुसकीच्या मूल्यातून वृक्षांची जपवणूक

वाढदिवस निमित्त : अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपणाचा उपक्रम

बीड / प्रतिनिधी-: वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करून सामाजिक कार्यकर्ते मुकुंद धुताडमल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते मुकुंद धुताडमल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवारातून हा उपक्रम राबविण्यात आला होता.बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून हा उपक्रम राबविण्यात आला. माणुसकीच्या मूल्यातून वृक्षांची जपवणूक करत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यामुळे मुकुंद धुताडमल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.आज घडीला समाजामध्ये वाढदिवस म्हटलं की मोठा खर्च करताना तरुण वर्ग दिसतो. मात्र हा अनावश्यक खर्च टाळून अगदी साध्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करणारी माणसे क्वचित आहेत.त्यापैकी सामाजिक कार्यकर्ते मुकुंद धुताडमल यांचा उल्लेख करावा लागेल. असे उदगार वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. दरम्यान रवी वाघमारे, मधुकर वाघमारे, हानुमान वाघमारे यांनी झाडे लावून वाढदिवस साजरा केला. यावेळी ॲड. शशिकांत सावंत, दत्ता साठे, रिपाइं तालुकाध्यक्ष कीसन तांगडे, डीपीआय जिल्हाध्यक्ष सुनिल पाटोळे, अजय पाटोळे, उमेश तुळवे, निखिल जाधव, नितिन धुताडमल, दिनेश पाटोळे, प्रकाश धुताडमल,प्रथमेश खडकीकर,सोनू पवार आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा