Subscribe Us

header ads

उर्दू दैनिक अलहीलाल टाइम्स व बज्म-ए-शमा अदब च्या पुरस्कार करिता प्रस्ताव सादर करावे

बीड स्पीड न्यूज 


उर्दू दैनिक अलहीलाल टाइम्स व बज्म-ए-शमा अदब च्या पुरस्कार करिता प्रस्ताव सादर करावे

या वर्षापासुन मौलाना अब्दुल रहेमान मिल्ली यांचे नावाने सर्वात्कृष्ट

उर्दू शाळा सोबत 3 राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचा आयोजन -अन्सारी, खान


बीड|प्रतिनिधी - : बीड जिल्ह्यात उर्दु पत्रकारितेचा वारसा जोपण्या सोबत उर्दू साहित्याचा वारसाही बीड जिल्ह्यातील एकमेव उर्दू दैनिक अलहीलाल टाइम्सनी उचलला आहे. या कार्यात बीड जिल्ह्यातील सर्वात जुनी साहित्य संघटना बज्म-ए-शमा अदब सोबत असून दोन्ही संघाच्या वतीने दरवर्षी उर्दूचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असुन यामध्ये विद्यार्थ्या करिता निबंध व वक्तृत्व स्पर्धा, उर्दू मुशायरा, शब-ए-गजल सोबत विविध क्षेत्रात करिता पुरस्काराचा आयोजन करण्यात येते. या पुरस्कारांमध्ये बीड जिल्ह्यातील आदर्श व्यक्तीचे नावाने नवीन पिढीला पुरस्कार प्रदान करुन दोन पिढीचा अंतर कमी करण्याचे सोबतच जुनी पिढीच्या कार्य व शिक्षण समोर आणण्याचे कार्य केले जात आहे. 2023 चे पुरस्कार करिता विविध क्षेत्रासाठी प्रस्ताव सादर करावे अशी विनंती व या वर्षापासुन बीड जिल्हास्तरावर
मौलाना अब्दुल रहेमान मिल्ली यांचे नावाने सर्वात्कुष्ट उर्दू शाळा व राज्यस्तरीय तीन आदर्श शिक्षक पुरस्कारचा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बज्म-एम-शमा अदब चे अध्यक्ष मुस्ताक अन्सारी, बज्म-एम-शमा अदब चे सचिव तथा उर्दू दैनिक अलहीलाल टाइम्स चे संपादक खमरूल इमान खान यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.याबाबत दिलेल्या माहितीनुसार दोन्ही संघाकडून बीड जिल्ह्यात त्रिभाषीक पत्रकारीतेचे मानबिंधु समजले जाणारे व बीड जिल्ह्यात सांय.दैनिक मराठी वर्तमानपत्रचे शिल्पकार स्व.जफरखान नाझ यांचे नावाने राज्यस्तरी नाझ-ए-सहाफत आदर्श पत्रकार पुरस्कार दिला जात असुन या पुरस्कार करिता
प्रस्ताव सादर करावा. तसेच दोन्ही संघाकडून दिले जाणार्‍या पुरस्कारामध्ये आदर्श व्यक्ती पुरस्कार मिल्लीया शाळेचे माजी सचिव अहेमद बिन अबुद चाऊस, बीडचे मुस्लिम समाजाचे वरिष्ठ नेते राशेद सलीम, प्रसिध्दी साहित्यकार व एडवोकेट खाजा मंजुरोद्दीन, बीडचे माजी मुस्लिम नगराध्यक्ष कामरेड अथरबाबर, बीडचे जेष्ठ शिक्षण तथा पत्रकार नजाबत अली उस्मानी यांचे नावाने जिल्हा व राज्यस्तरावर आदर्श व्यक्ती पुरस्कार दिले जात आहे. या करिता मुस्लिम समाजात उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक, नगरसेवक, नेते,वकिल, डॉक्टर, संस्थाचालक आदींनी प्रस्ताव सादर करावा. सोबतच उर्दू भाषेच्या विस्तारासाठी अमुल्य योगदान देणारे अहेमद पाशा अन्सारी यांचे नावाने राज्यस्तरीय उर्दू मित्र पुरस्कार दिला जात आहे. ज्याकरिता राज्यात उर्दू भाषेच्या विस्तार व प्रोत्साहनसाठी कार्य करणार्‍यानी प्रस्ताव सादर करावा. बीड जिल्ह्यातील प्रथम उर्दू भाषेचे विस्तार अधिकारी महेबुब खान युसूफ जई यांचे नावाने जिल्ह्यास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार दिला जात असुन बीड जिल्ह्यातील पत्रकारांनी याकरिता प्रस्ताव सादर करावे. या वर्षापासुन राज्यस्तरावर बीडचे माजी शिक्षण अशरफोद्दीन फैजी, मिल्लीया शाळेचे संस्थापक मिर रोनख अली व मिल्लीयाचे माजी शिक्षक सय्यद अशरफ यांचे नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार चा आयोजन करण्यात आला असुन राज्यस्तरीय या तीन्ही पुरस्कार करिता मुस्लिम समाजातील राज्यस्तरावरील शिक्षकांनी विशेषता: उर्दू माध्यमचे शिक्षकांनी प्रस्तावर
सादर करावे. तसेच बीड जिल्हास्तरावर मिल्लीयाचे माजी शिक्षक गुलाम मोहंमद, मल्टीपर्पसचे माजी शिक्षक सुजात खान युसुफ जई, मिल्लीयाचे माजी शिक्षक मोहंमद फजलोद्दीन, मुस्लिम धर्मगुरू गुल मोहंमद, प्रसिध्दी कवी गौस मोईयोद्दीन सोजा, मिल्लीयाचे माजी शिक्षक शेख उमर, तलवाडा जि.प.चे माजी शिक्षण असदउल्ला खान युसुफ जईचे नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार करिता बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे विशेषता: उर्दू माध्यमचे शिक्षकांनी प्रस्ताव सादर करावा. सोबतच क्रीडा क्षेत्रात जिल्हास्तरावर मुस्लिम समाजाचे खेळाडूना माजी वॉलीबॉल पटू अखतर सलीम यांचे नावाने आदर्श खेळाडू पुरस्कार दिला जात आहे. ज्याकरिता प्रस्ताव सादर करावा. या वर्षापासुन बीडचे प्रसिध्दी मुस्लिम धर्मगुरू मौलाना अब्दुल रहेमान
मिल्ली साहेब यांचे नावाने जिल्हास्तरावर सर्वात्कृष्ट उर्दू शाळा पुरस्कार सुरू करण्यात आला असुन, बीड जिल्ह्यातील उर्दू शाळांनी या करिता प्रस्तावर सादर करावे.सर्व पुरस्कार करिता इच्छुकांनी तीन प्रतीत आपले प्रस्ताव तय्यार करुन 30 जुलै पर्यंत उर्दू दै.अलहीलाल टाइम्स चे कार्यालय महाराष्ट्र ऑप्टिकल शेजारी अथरबाबर कॉम्प्लेक्स बशीरगंज बीड येथे सादर करावे. अधिक माहिती करिता 7020837853 या क्रमांकावर संपर्क करावा. अशी माहिती मुस्ताक अन्सारी व खमरूल इमान यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा