Subscribe Us

header ads

नगर परिषद निवडणूक ताकतीने लढविण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय - अशोक हिंगे

बीड स्पीड न्यूज 


नगर परिषद निवडणूक ताकतीने लढविण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्णय - अशोक हिंगे



बीड ( प्रतिनिधी ) आगामी होऊ घातलेल्या बीड नगर परिषद निवडणूक स्वबळावर आणि ताकतीने लढविण्याचा निर्णय आज झालेल्या शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी दिली आहे.दिनांक १२ जुलै रोजी बीड शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख जिल्हा  पदाधिकारी यांची बैठक मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व शहरातील सामाजिक चळवळीतील परिवर्तन वादी अभ्यासु कार्यकर्त्यांना सत्तेत जावेत यासाठी वंचित बहुजन आघाडी ताकतीने निवडणूक लढवेल वेळप्रसंगी समविचारी पक्ष संघटना यांना सुद्धा बरोबर घेऊ असे यावेळी हिंगे  म्हणाले.बैठकीत प्रभाग निहाय संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यात आली.या बैठकीला जेष्ठ नेते बबनराव वडमारे जिल्हा पदाधिकारी ज्ञानेश्वर कवठेकर, पुरूषोत्तम वीर, अनुरथ वीर, अनंतराव सरवदे, संतोष जोगदंड दगडु गायकवाड, बालाजी जगतकर,प्रा.गणेश खेमाडे, अजय सरवदे, पुष्पाताई तुरुकमाने,शेख युनुस,लखन काका जोगदंड,संदीप जाधव, शेख मुबीन,मोहम्मद मोईजोद्दी,राजेशकुमार जोगदंड,उमेश तुळवे सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा