Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका -2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

बीड स्पीड न्यूज 


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका -2022 

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

बीड|प्रतिनिधी-: दि. 12  मा. राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांचे सदर्भीय पत्रान्वये  जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका-2022  आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यानी दिलेल्या प्रपत्र -3 मधील सूचनेनुसार दि. 13 जुलै 2022 (वार-बुधवार) रोजी ठिक दुपारी 1:00 वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.तरी सदर बैठकीस राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रतिष्ठीत नागरीक यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. सदर बैठकीस उपस्थित राहतांना आपले आधार कार्ड ई. ओळखपत्र सोबत ठेवावे असे डॉ. दयानंद जगताप उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाव्दारे कळविले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा