Subscribe Us

header ads

नगर परिषदेच्या विरोधात लॉलीपॉप आंदोलन

बीड स्पीड न्यूज 


नगर परिषदेच्या विरोधात लॉलीपॉप आंदोलन

बीड |प्रतिनिधी -: चिखल बीड व्यवस्थेस जबाबदार नगरपरिषद प्रशासना विरोधात "लॉलीपॉप आंदोलन "; शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करत असल्याने डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या विरोधात लॉलीपॉप आंदोलन सुरु बीड शहरातील शाळेकडे जाणारे बहुतांश रस्ते पावसाळ्यात चिखलमय असल्याने चिखलात पायातील चप्पल, बुट फसत असुन अपघात होऊन जखमी होऊ शकतात, विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत असून लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष व नगरपरिषद प्रशासनातील अधिका-यांच्या | ढिसाळ नियोजनाच्या धोरणाच्या निषेधार्थं सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली बशीरगंज चौकात बीड नगरपरिषद कार्यालयासमोर रस्ता, वीज, पाणी आदि. मुलभुत सुविधा न देताच केवळ आश्वासने देऊन बीडकरांची दिशाभूल व फसवणूक केल्याच्या निषेधार्थ "लॉलीपॉप आंदोलन "करण्यात येऊन घोषणाबाजी करत बशीरगंज चौक ते मुख्याधिकारी नगरपरिषद बीड कार्यालय रॅली काढण्यात आली.बीड जिल्हाध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ, शेख युनुस च-हाटकर, पाटोदा तालुकाध्यक्ष सतिश गर्जे, पाटोदा तालुका सचिव हमीदखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबेद, शेख मुबीन बीडकर, शिक्षण हक्क आधिकार कार्यकर्ते मनोज जाधव, आदि सहभागी झाले होते. निवेदन प्रशासक मुख्याधिकारी नगरपरिषद बीड उमेश ढाकणे यांना देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा