Subscribe Us

header ads

बीड न्यायालयाने सुनील पाखरे यांच्या अवैध बांधकामस दिली स्थगिती

बीड स्पीड न्यूज 


बीड न्यायालयाने सुनील पाखरे यांच्या अवैध बांधकामस दिली स्थगिती


इंडियन इसमेन्ट ऍक्ट १८८२ प्रमाणे  दोन शेजारी असणाऱ्या घरामध्ये जागा सोडणे महत्वाचे

 

बीड(प्रतिनिधी):-कुठल्याही दोन शेजारी असणाऱ्या घरामध्ये नगररचना अधिनियमाप्रमाणे जागा सोडणे महत्वाचे आणि कायदेशीर असते. ज्यामध्ये होणाऱ्या बांधकामामुळे शेजारील राहणाऱ्या व्यक्तीस ऊन, शुद्ध हवा, उजेड, सूर्यप्रकाश, पाणी तसेच उच्च आवाजचे प्रदूषण याचा अडथळा होऊ नये अशी तरतूद आहे. त्यानुषंगाने दोन घरांमध्ये योग्य मोकळी जागा सोडणे कायदेशीर आणि अनिवार्य असते. जे कि दोन्ही घरांच्या मालकी हक्कांचे संरक्षण करण्यास जरुरी असते. बीड न्यायालयाने इंडियन इसमेन्ट ऍक्ट १८८२ नुसार शहरातील भक्ती कंट्रक्शन भागातील सुनील सुभाष पाखरे यांच्या अवैध बांधकामास स्थगिती दिली आहे.माननीय दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) बीड यांच्या न्यायालयात दि.२० जुलै रोजी इंडियन इसमेन्ट ऍक्ट १८८२ वर खटल्याच्या प्रथम ऑपरेटिव्ह ऑर्डर जारी झाला. त्यामध्ये, एसेमेन्ट ऍक्ट प्रमाणे सदरील अवैध बांधकामास स्थगिती देण्यात आली आहे.बीड शहरातील भाग्योदय गृहनिर्माण सोसायटी, भक्ती कन्सट्रकशन जवळ सावजी.डी.एस यांनी शेजारील चालू केलेल्या अवैध बांधकामाबद्दल नगरपालिकाला अनेक पत्र व अर्ज केले. या विषयामध्ये मदत मागीतली. होणाऱ्या बांधकामामुळे सर्व नियम धाब्यावर बसवून कसे अयोग्य बांधकाम होत आहे हे कळविले. त्यानुसार नगरपालिकेने सुनील सुभाष पाखरे यांच्या अवैध बांधकामाची पाहणी करत त्यास झालेले अवैध बांधकाम काढून टाकण्याची नोटीस बजावली होती मात्र एवढे करूनही सुनील पाखरे याने या नोटीस ला कसलाच दुजोरा न देता, हे अवैध बांधकाम चालू ठेवले होते. चालू असलेल्या अवैध व नियमबाह्य बांधकामध्ये घराची मुख्य भिंतीला काहीच अंतर न ठेवता बांधण्यास सुरवात केली होती. तसेच कुठलेच मोकळी जागा न सोडता बांधकाम केलेले आहे. अपंगत्व आल्याने सावजी.डी.एस यांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत होता. शुद्ध हवा, ऊन, सूर्यप्रकाश ह्या नैसर्गिक व हक्काच्या बाबी सदरील बांधकामामुळे अडवल्या जात होत्या व मूलभूत अधिकारावर व असणाऱ्या अस्तित्वावर गदा घालण्यात येत होती. त्यामुळे याविषयात सावजी.डी.एस यांनी सुनील पाखरे यांच्या विरोधात न्यायालयात न्यायाची दाद मागितली त्यानुसार न्यायालयात इसमेन्ट ऍक्ट नुसार खटला चालू केला होता. या प्रकरणी मा.न्यायालयाने दोन्ही बाजूंची म्हणणे ऐकत, खोटा प्रतिदावा फेटाळत सुनील सुभाष पाखरे यास सावजी.डी.एस यांच्या दिशेला कुठलेच बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सावजी.डी.एस. यांना इसमेन्ट ऍक्ट नुसार न्याय मिळाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा