Subscribe Us

header ads

शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याचे फलक लावा. -मुश्ताक कुरेशी.

बीड स्पीड न्यूज 

शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याचे फलक लावा. -मुश्ताक कुरेशी.


माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील सर्व शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याचे फलक दिसुनच येत नसल्यामुळे ते फलक कार्यालयात लावण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे केलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात कुरेशी यांनी सांगितले की, तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसील, पंचायत समिती, डाक,वीज वितरण सार्वजनीक बांधकाम, तलाठी,गटशिक्षणाधिकारी ,जि.प.बांधकाम कार्यालया सह शहर व ग्रामिण पोलिस ठाणे,ग्रामिण रुग्णामध्ये माहिती अधिकार कायद्याचे फलक लावलेले दिसुन येत नसल्यामुळे माहिती अधिकार कायद्यानुसार कुणा कडे कशी माहिती मागायची यात अडचणी निर्माण झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते ‌संभ्रात सापडले आहेत. याविषयी जिल्हाधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन सर्व शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याचे फलक संबंधित कार्यालयात प्रमुखांनी लावलेच पाहिजे असे आदेश जारी करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तातडीने फलक लावले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेवटी मुश्ताक कुरेशी यांनी निवेदनात दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा