Subscribe Us

header ads

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी

बीड स्पीड न्यूज 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी

बीड - राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांसाठी आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हापरिषदेसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तर पंचायत समित्यांची आरक्षण सोडत तहसीलदारांच्या पातळीवर केली जाणार आहे. आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी काढण्यात येणार असून त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. आक्षेपांवर निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल २५ जुलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. तर आयोग त्यानंतर २९ जुलै रोजी आरक्षण सोडतीला मंजुरी देणार असून २ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. सध्या राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असल्याने यावेळी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला असेच आरक्षण काढले जाणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या ६९ गटांसह जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या १३८ गणांमधून हे आरक्षण काढण्यात येणार असून एकूण संख्येच्या ५० महिला सदस्य असणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा