Subscribe Us

header ads

आषाढी एकादशी, बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड स्पीड न्यूज 



आषाढी एकादशी, बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

 - नियोजन समिती सभागृहात शांतता समितीची बैठक संपन्न- कायद्याचे उल्लंघन, अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश


 

बीड|प्रतिनिधी-:  दि. 05 (जि. मा. का.) : देवशयनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन सण एकाच दिवशी येत्या रविवारी दि. 10 जुलै रोजी साजरे होत आहेत. दोन्ही सण सौहार्दपूर्ण वातावरणात व शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून कायद्याचे कोठेही उल्लंघन होणार नाही व कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याबाबत संबंधित सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले.जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरावरील शांतता समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील 

लांजेवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.दोन्ही सण साजरे करताना नागरिकांनी सामाजिक सलोखा ठेवावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, दोन्ही सणांच्या पार्श्वभूमिवर सर्व तालुक्यांत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करावी. नगरपरिषदेचे किंवा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी या समितीचे सदस्य असतील. या समितीने तालुकास्तरावर बैठक घेऊन सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून नियोजन करावे. नागरिकांना तक्रारीची संधी देऊ नये. तसेच या बैठकीमध्ये धर्मगुरूंना निमंत्रित करून सणाची माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, सामाजिक सलोखा व सार्वजनिक शांतता भंगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या प्रत्येक घटनेवर 

बारकाईने नजर ठेवावी. पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन, नगरपरिषद, नगरपंचायत, महावितरण यासह संबंधित विभागांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. संवेदनशील स्थळी पोलीस बंदोबस्त, गर्दीच्या व पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी. आवश्यकतेनुसार लॉज, ढाबे, हॉटेल्सची व बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी, धार्मिक स्थळी वाटप करण्यात येणाऱ्या प्रसाद व अनुषंगिक बाबींची तपासणी करावी. तसेच सोशल मीडियाद्वारे कोणत्याही अफवांचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सामाजिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित करू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी बैठकीचा हेतू विषद केला. यावेळी दोन्ही धर्माचे धर्मगुरू, नागरिकांनी मौलिक सूचना केल्या. बैठकीस विविध विभागांचे शासकीय अधिकारी, तालुका स्तरावरील विविध समित्यांचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीत गायनाने बैठकीची सांगता झाली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा