Subscribe Us

header ads

बीड जिल्हयात विवाह नोंदणी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करा - एकल महिला संघटनेची मागणी

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हयात विवाह नोंदणी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करा - एकल महिला संघटनेची मागणी

बीड प्रतिनिधी / दि.20 कोरो हि सामाजिक संस्था महाराष्ट्रातील विविध स्थानिक सामाजिक संस्था/संघटना यांच्यासोबत महिलांना संपत्तीत अधिकार . मिळण्यासाठी काम करते मराठवाडा विभागामध्ये हे काम एकल महिला संघटना कोरो या संस्थेसोबत केले जात आहे. या कामादरम्यान लक्षात आहे कि, विवाहित महिलांना सासरकडील संपत्तीत अधिकार मिळण्यासाठी विविह नोदणी प्रमाणपत्र असल्यास सोयीचे होते. आपल्याकडे दरवर्षी मोठया प्रमाणात विवाह होतात परंतु कायदेशीर विवाह नोदणीचे प्रमाणपत्र अत्यल्प आहे. आम्ही कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, परिचम महाराष्ट्र, विदर्भ विभागातील पाच तालुक्यातील पाच ग्रामपंचायत मधील 500 महिलांसोबत केलेल्या सर्वेक्षणात असे आढळुन आले कि केवळ 38 महिलांची विवाह नोंदणी झाली आहे म्हणजेच  विविह नोंदणीचे प्रमाणपत्र 7% च्या आसपास आहे. त्यामुळे विविह नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी काम करण्याची गरज आहे विवाह नोंदणीचे प्रमाण वाढल्यास महिलांना अनेक  फायदे होऊ शकतील.या शिष्टमंडळात  एकर महिला संघटनेच्या चित्रा पाटील, तारा घोडके, रुक्मिणी नागापुरे, मीरा नाईकवाडे, लता सावंत, प्रजावती जोगदंड, शारदा सोनवणे, उर्मिला गालफाडे, मंगल कानडे, आशालता पांडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा