Subscribe Us

header ads

हातावरचे पाेट भागवणाऱ्या २५ व्यवसायीकांना माेठ्या छत्रीचे माेफत वाटप

बीड स्पीड न्यूज 


हातावरचे पाेट भागवणाऱ्या २५ व्यवसायीकांना माेठ्या छत्रीचे माेफत वाटप

राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल अाणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्त उपक्रम


बीड|प्रतिनिधी-: शहरामधील विविध ठिकाणी हातावर पाेट भागवणाऱ्या गरजवंत व्यवसायीकांची पावसामुळे गैरसाेयी हाेऊ नये, त्यांचा राेजगार खंडित हाेऊ नये म्हणून राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल अाणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्तविद्यमाने साेमवारी (दि. ११) माेठ्या २५ छत्रीचे वाटप करण्यात अाले. यावेळी 

व्यवसायीकांनी माेफत छत्री पावसाच्या दिवसात उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व अाभार मानले.बीड शहरामधील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर चाैक पुतळा, माळीवेस, सुभाष राेड, भाजी मंडई, सांगली बँक काॅर्नर यासह इतर भागामध्ये जे छाेटे व्यवसायीक अाहेत. त्यांना पावसाळ्यामध्ये माेठ्या गैरीसाेयीला सामाेरे जावे 

लागते. ही गरजवंतांची अडचण अाेळखून राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल अाणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठाचा संयुक्तविद्यमाने २५ माेठ्या अाकाराच्या छत्री वाटप करण्याचे नियाेजन केले. साेमवारी (दि. ११)  हा उपक्रम प्रत्यक्षात राबवला. द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा डाॅ. नितीन मंत्री राेटरी क्लब अाॅफ 

बीड सेंट्रल संस्थापक अध्यक्ष तथा या प्राेजेक्टचे चेअरमन संदेश लाेळगे, सुकेश राव यांच्या मार्गदर्शनाखाली व क्लबचे अध्यक्ष परमेश्वर जाधव, सचीव रवी उबाळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात अाला. शहरात विविध ठिकाणी माेफत छत्री वाटपाच्या वेळी क्लबचे ज्ञानेश्वर तांबे, गणेश वाघ, कचरु चांभारे, अजय घाेडके, गिरीष गिलडा, मुकेश अाग्रवाल, महेश जाेशी, अभिनंदन कांकरीया, सुहास बेदरे, समाधान कुलकर्णी, डाॅ. सुहास  धुमाळ, डाॅ. सचीन वारे, सुशील अब्बड, उमेश संचेती, प्रितेश संचेती, राजीव संचेती, अतुल जाजू, संदीप डाेंगरे, प्रमाेद करमाळकर, प्रदीप मालपाणी, हेमंत बडवे, डाॅ. शाम चरखा, नितीन सारडा, विश्वास शेंडगे यांच्यासह सर्व बाेर्ड अाॅफ डायरेक्टर, क्लबचे सदस्य व पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
-------

अजाेबा यांच्या स्मरणार्थ उपक्रम

द्वारकादास मंत्री हे माझे अजाेबा अाहेत. त्यांचे सामाजिक कार्यात माेठे याेगदान हाेते. त्यांच्या स्मरणार्थ साेमवारी राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल अाणि द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने गरजवंत छाेटे व्यवसायीकांना छत्री वाटपाचा उपक्रम राबवला अाहे.

- डाॅ. नितीन मंत्री, सर्वेसर्वा, प्रतिष्ठान, बीड.
------

गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग

बीड शहरामध्ये मागील अाठ वर्षापासून राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रलद्वारे विविध उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवले अाहेत.द्वारकादास मंत्री सामाजिक प्रतिष्ठान यांच्या समवेत हा गरजवंतांना मदतीच्या उपक्रमात सहभाग घेतला. व्यवसायीकांनी व्यक्त केलेले समाधान हे प्रेरणादायी अाहे.

- परमेश्वर जाधव, अध्यक्ष, राेटरी क्लब अाॅफ बीड सेंट्रल  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा