Subscribe Us

header ads

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिन


बीड स्पीड न्यूज 

सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिन

बीड  / प्रतिनिधी-: शहरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजक करण्यात आले . यावेळी बोलताना प्रशांत पवार म्हणाले की , प्रचंड प्रमाणात वाढत जाणारी लोकसंख्या ही विकासातील गतीरोधक नव्हे तर फार मोठा अडशळा आहे . झपाट्याने वाढत  जाणाऱ्या लोकसंख्येमुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत . पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की , ' छोटे कुटुंब सुखी कुटुंब ' या संकल्पनेतून प्रत्येक  कुटुंबाला ‌मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावयाच्या असतील तर लोकसंख्या वाढीवरील उपाययोजनांची जनजागृती करून नियोजनबद्ध आणि कृतिबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली पाहिजे , विद्यार्थ्यांच्या मनामध्ये छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना रुजली  गेल्यास  येणाऱ्या भविष्य काळात भारतासारख्या विकसनशिल देशात लोकसंख्या नियंत्रणात आणून प्रत्येक व्यक्तीला मुलभूत गरजांची उपलब्धता करून देणे सहज शक्य होईल . लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने  सुरु केलेल्या योजनांची जनतेकडून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असेही श्री प्रशांत पवार म्हणाले . शाळेच्या  प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ . नंदकुमार उघाडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व काही विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा