Subscribe Us

header ads

दिख्खत यांच्याकडून माणूसकीचे दर्शन

बीड स्पीड न्यूज 


दिख्खत यांच्याकडून माणूसकीचे दर्शन



किल्लेधारूर (प्रतिनिधी) धारूर शहराच्या लगत असणारा गोपाळपूर ग्रामपंचायतचा भाग  या भागात शासकीय विविध कार्यालय आहेत धारूर ग्रामीण रुग्णालय याच भागात असून रुग्णालय कडे जाणारा रस्ता खूप मोठे खड्डे पडल्याने अनेक अडचणींना प्रवाशांना नागरिकांना रुग्णांना सामोरे जावे लागत होते. धारूरचे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे उद्योजक विजयसिंह दिखत यांच्या वतीने या रस्त्यावर स्वखर्चतून ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजवत त्यावर रोलर फिरवण्यात आले यामुळे या सामाजिक उपक्रमाचे धारूर सह तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे
या रस्त्यासाठी शासकीय निधी मंजुरी असल्याचे समजते मात्र योग्य वेळी कामे न करता कालावधी संपल्यानंतर हा निधी परत जातो कधी कधी तर थातूरमातूर रस्ता करून अनेक ठिकाणी  लाखो रुपयांचा निधी हडप केला जातो यामध्ये गुत्तेदार शासकीय अधिकाऱ्यांचे साठे लोटे असते त्यामुळे तालुक्यातील असे महत्त्वाचे कामे योग्य वेळी होत नाहीत मात्र सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक यांनी स्वखार्चातून या रस्त्यावर मोठ मोठ्या पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून ते डोजरने दाबून नागरिकांची गैरसोय थांबवली आहे यामुळे विजय सिंह दिखत यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा