Subscribe Us

header ads

केन स्टार अकॅडमी मध्ये अवतरली अवघी पंढरी विठू माझा लेकुरवाळा

बीड स्पीड न्यूज 


सातोना पांडूरंग शिंदे


केन स्टार अकॅडमी मध्ये अवतरली अवघी पंढरी विठू माझा लेकुरवाळा



सातोना-: शाळेत आषाढी एकादशी च्या निमित्ताने विद्यार्थी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी, संत माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत एकनाथ महाराज, तर मुली संत जनाबाई, संत बहिणाबाई, अश्या विविध वेशभूषेत आली होती, तर सर्व विद्यार्थी वारकरी ड्रेस मध्ये आली होती, तसेच पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात टाळ, मृदंग, टाळी यांनी 

सर्व दिंडी दुमदुमून गेली होती, यातून विद्यार्थांना महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यास मदत होईल, महाराष्ट्राची संस्कृती जतन करणे हे मूल्य त्यात रुजवण्यासाठी मदत होईल, तर वारकऱ्यांची भगवी पताका समर्थ खांद्यावर पेलणारी व पुढे घेऊन जाणारी पिढी तयार होण्यास हातभार लागेल,दिंडी नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी व यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका ,  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा