Subscribe Us

header ads

चोरीचा पुरावा सापडून देखील ए पी आय आघाव यांची कारवाई करण्यास टाळाटाळ!

बीड स्पीड न्यूज 


 चोरीचा पुरावा सापडून देखील ए पी आय आघाव यांची  कारवाई करण्यास टाळाटाळ





बीड-: पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोरीच्या घटना घडत आहेत पिंपळनेर पोलीस मात्र चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. अशीच घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे कुक्कडगाव येथे घडली ३ जुलै रोजी अप्पासाहेब चक्रे यांच्या घरात चोरी झाली चोरट्याने घरातील दोन ग्राम सोन्याचे मनी. पायातील जोडवे आणि नगद ३०.००० रुपये आणि घरातील काही साड्या फाडून टाकल्या ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी पिंपळनेर येथील पोलीस मेखले यांना बाजूच्या घरात चोरीचा पुरावा भेटला घरात पुरावा भेटून देखील ए पी आय आघव यांनी चोरट्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. आणि आणखीन पुरावा पाहिजे म्हणुन चोरट्यांना पाठीशी घालत आहेत. जर पुरावा सापडून देखील पिंपळनेर पोलीस कोणती ही कारवाही करत नाहीत तर या भागात गुन्हेगारी कोन रोखणार आणि पिंपळनेर पोलीस चोरट्या विरुद्ध कारवाही का करत नाहीत असा मोठा प्रश्न आहे. तरी  वरिष्ठ अधिकारी यांनी ए पी आय अघाव हे कारवाही का करत नाहीत याची चौकशी करून न्याय मिळऊन द्यावा अशी मागणी अप्पासाहेब चक्रे यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा