Subscribe Us

header ads

प्लास्टिक बंदी बाबत होणाऱ्या कारवाईला माजलगावात व्यापाऱ्यांचा विरोध - न.प. मुख्याधिकाऱ्यांना व्यापारी संघटनेचे निवेदन

बीड स्पीड न्यूज 

प्लास्टिक बंदी बाबत होणाऱ्या कारवाईला माजलगावात व्यापाऱ्यांचा विरोध - न.प. मुख्याधिकाऱ्यांना व्यापारी संघटनेचे निवेदन

माजलगाव / प्रतिनिधी-: वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यामुळे अशातच राज्य सरकारने ५१ माईक्रॉन पेक्षा कमीच्या व विघटन न होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी केली आहे. हा विषय व्यापाऱ्यांना मान्य आहे. परंतु व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्रात कुठेही ५१ माईक्रॉन पेक्षा जास्त जाडीचे प्लास्टिक उपलब्ध नाही. हे प्लास्टीक उपलब्ध होईपर्यंत किंवा व्यापाऱ्यांना दुसरा पर्याय मिळेपर्यंत व्यापाऱ्यांवर प्लास्टिक वापराबाबत होणाऱ्या कारवाया थांबविण्यात याव्यात अशा स्वरूपाचे निवेदन किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने माजलगाव नगरपालिकेला देण्यात आले.ग्राहकांना किराणा किंवा जीवनावश्यक वस्तु देतांना खूप अडचणी निर्माण होत आहेत. व्यापार करण्यास गैरसोय होत आहे. ५१ माईक्रॉन पेक्षा जास्त जाडीचे साहीत्य उपलब्ध होत नाही, तोपर्यंत व्यापाऱ्यांवर होणाऱ्या कारवाया थांबवण्यात याव्यात असे कॅट संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोळंके म्हणाले. नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कारवाई करताना भेदभाव ठेवुन कारवाया करु नये. पर्याय उपलब्ध होण्यापुर्वी कारवाया केल्या तर व्यापारी वर्गाला बाजारपेठ बंद करावी लागेल व होणाऱ्या परिणामाची व नुकसानाची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनाद्वारे व्यापारीवर्गाकडून म्हणण्यात आले आहे. यावेळी तुषार भुतडा, अश्विन राठोड, श्रीकिसन कालिया, पंकज मालानी, दिगंबर शिंदे, अशोक गुजर, वैजनाथ यादव, राहुल खुरपे, नंदकुमार मेहता, अशोक बिक्कड, बाजीराव ताकट, संजय राऊत, पप्पू शिनगारे, कपिल पगारिया, लक्ष्मीकांत झिंजूर्के व भरपूर संख्येने व्यापरी वर्ग उपस्थित होते.


व्यापारी वर्ग हा प्रशासनास केव्हाही सहकार्य करण्यासाठी तयार असतो त्याचे उदाहरण व्यापार्यांनी लॉकडाऊन मध्ये प्रशासनास सहकार्य करून दाखवले आहे.परंतु कायद्याचा बडगा दाखवून व्यापारी वर्गात स्थानिक प्रशासन विनाकारण त्रास देत असेल तर व्यापाऱ्यांना आक्रमक आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- संजय सोळंके, तालुकाध्यक्ष, कॅट व्यापारी संघटना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा