Subscribe Us

header ads

भोकर तालुक्यातील मातुळ या गावी आदिशक्ती प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न.

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी. प्रकाश कारलेकर 


भोकर तालुक्यातील मातुळ या गावी आदिशक्ती प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक संपन्न.



नांदेड|प्रतिनिधी-: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत भोकर तालुक्यातील मातुळ या गावी दिनांक 01 जुलै 2022 रोजी आदिशक्ती प्रभाग संघाची बैठक विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे घेण्यात आली.कै. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषिदिना निमित्त आणि SBI बँकांचा लॉगिन डे च्या निमित्त मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम जी. प.नांदेड तसेच मा. डॉ. संजय तुबाकले साहेब अतिरिक्त मुख्य कार्यकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जी. प. नांदेड तसेच मा.गटविकास अधिकारी श्री अमित  सर यांच्या मार्गदर्शनाखाली
भोकर तालुक्यातील मातुल गावात आदिशक्ती महिला प्रभाग  संघाची आज नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली सदरील वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभाग संघाच्या अध्यक्षा सीमा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आल्या प्रथमतः सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले SBI बँकें मार्फत 18 समूहांना 18 लक्ष वाटप करण्यात आले लगेच गावच्या लिपिका व CRP ताईनीं त्यांच्या गावात झालेल्या उपक्रम बाबत सादरीकरण केलं त्या नंतर प्रभाग संघाचे कोषाध्यक्ष यांनी प्रभाग संघाचा लेखा-जोखा सादर करण्यात आला. सदरील प्रभाग संघाचे जमा खर्च , ताळेबंद, उत्पन्न झालेल्या लेख्या  जोख्याचे वाचन करण्यात आले व चालू वर्षाचे नियोजन बाबतचा आराखडा वाचून ह्या आराखड्यानुसार कामाची गती वाढवणे संदर्भात निर्णय घेण्यात आला.सदरील कार्यक्रमाला जिल्हा अभियान व्यवस्थापक तथा सांख्यिकी विस्तार अधिकारी श्री मा. गजानन पातेवार साहेब यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून उमेद अभियानाबद्दल दशसूत्री चे पालन करावे तसेच उपजीविके संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.व
जिल्हा व्यवस्थापक श्री गणेश कावडेवार यांनी देखील उमेद अभियानाबद्दल माहिती सांगून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
SBI बँकेचे बँक मॅनेजर शैलेश सर, 
SBI चे क्षेत्र अधिकारी नागेश सर, 
तालुका अभियान व्यवस्थापक अनिरुद्ध जोशी, 
तालुका व्यवस्थापक कविता भंडारे यांनी उपस्थित समूहाच्या सर्व महिलांना उचित मार्गदर्शन केले. ग्रामसेवक विजापूर साहेब प्रभाग समनव्यक परमेश्वर करहळे  सदरील कार्यक्रमासाठी समूहातील महिला उपस्थित होत्या तसेच CRP, ग्रामसंघ लिपिका, प्रभाग संघ लिपिका ,वर्धिनी, MIP CRP, PIP CRP,SHG auditor सर्वांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा