Subscribe Us

header ads

निजामाबाद - नांदेड सवारी पॅसेंजर गाडी ११ जुलै पासून सुरू:-दत्ता पाटील जाधव यांच्या मागणीला यश

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कारलेकर

निजामाबाद - नांदेड सवारी पॅसेंजर गाडी ११ जुलै पासून सुरू:-दत्ता पाटील जाधव यांच्या मागणीला यश


नांदेड|प्रतिनिधी-: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली नांदेड ते निजामाबाद पॅसेंजर (गाडी क्रमांक ५७-५५७, ५७५५८)गाडी कोरोना काळात बंद होती. परंतु कालांतराने हळूहळू सर्व गाड्या चालू करण्यात आल्या होत्या, पण सर्व प्रवाशांच्या सोईची असणारी नांदेड ते निजामाबाद धावणारी सवारी गाडी अद्याप चालू करण्यात आली नव्हती. त्यात कर्मचारी वर्ग व इतर प्रवाशांची मोठी हेळसांड होत होती. त्यात बरेच प्रवाशी वर्ग भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस दत्ता पाटील जाधव यांना सवारी गाडी चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आग्रह केला असता, त्यांनी लगेच जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांना वेळोवेळी पाठपुरावा केला. व खासदार महोदयांनी देखील रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील व  रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्याची दखल रेल्वे विभागाच्या वतीने एक परीपत्रक काढले आहे. त्यात दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने अनेक रेल्वे गाड्या नव्याने सुरू करण्यात येत आहेत. त्याच परीपत्रकात निजामाबाद ते नांदेड आणि नांदेड ते निजामाबाद सवारी गाडीचा उल्लेख करण्यात आला आहे. दत्ता पाटील जाधव व सर्व प्रवाशांच्या मागणीला आता यश आले असून येत्या ११ जुलै ला ही सवारी गाडी सुरू होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा