Subscribe Us

header ads

खून प्रकरणातील फरार आरोपीला पुण्यातून अटक

बीड स्पीड न्यूज 

खून प्रकरणातील फरार आरोपीला पुण्यातून अटक


बीड | प्रतिनिधी-: छेडछाडीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना 29 जून रोजी बीडमध्ये शहर ठाणे हदद्दीत घडली होती. उपचारा दरम्यान सदरील तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन तरूणांविरूध्द शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील एका फरार आरोपीस शहर पोलिसांच्या पथकाने पुणे शहरातील येरवाडा भागातून ताब्यात घेत अटक केले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.अक्षय उर्फ चिंटु मिठू गायकवाड (25 रा पात्रुड गल्ली, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील सिध्दार्थ गायकवाड या तरूणाला मारहाण झाली होती. उपचारा दरम्यान सदरील तरूणाचा 2 जुलै रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताच्या वडिलाच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात अक्षय गायकवाड व अभिषेक गायकवाड या दोघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी फरार होते. दरम्यान यातील अक्षय हा आरोपी पुण्यात असल्याची माहिती तांत्रिक तपासाआधारे मिळाल्यानंतर पोलिसांनी पुण्यात जावून त्यास ताब्यात घेत अटक केली. संबंधित आरोपीविरूध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. दरम्यान अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा