Subscribe Us

header ads

सकारात्मक काम करणार्‍यांसाठी बीड जिल्हा चांगला विलास गपाट यांचे प्रतिपादन; सेवापूर्ती सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

बीड स्पीड न्यूज 


सकारात्मक काम करणार्‍यांसाठी बीड जिल्हा चांगला
विलास गपाट यांचे प्रतिपादन; सेवापूर्ती सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

बीड | प्रतिनिधी-: कुठलेही काम करतांना आपले शंभर टक्के योगदान द्या, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. हाच मंत्र मी आजवरच्या वाटचालीत अंमलात आणल्याने कधीही अडचण आली नाही. आहे तेव्हढ्यावरच समाधान न मानता सतत नाविन्याचा ध्यास घेतल्याने मी आज कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त होत आहे. विशेषतः बीडला रुजू होतांना थोडी साशंकता होती. परंतु येथे काम केल्यानंतर येथील लोक अतिशय चांगले आहेत. सकारात्मक भूमिका ठेवून काम करणार्‍या अधिकार्‍याला कोणतीही अडचण येत नाही असे प्रतिपादन कार्यकारी अभियंता विलास गपाट यांनी केले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास गपाट यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. शासकीय निवासस्थानाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अधिक्षक अभियंता थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष व बीडला नुकतेच रुजू झालेले कार्यकारी अभियंता यु.बी.झगडे, कार्यकारी अभियंता अनिल सगर, कार्यकारी अभियंता प्रविण मार्कंडे, कार्यकारी अभियंता पोत याबरोबरच जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, मित्रपरिवार व कुटूंबीयांची उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे बीड व उस्मानाबाद येथील अधिकारी, कर्मचार्‍यांनी विलास गपाट यांचा सपत्नीक सत्कार केला.सत्कार सोहळ्याला उत्तर देतांना विलास गपाट म्हणाले, बीडला नियुक्ती मिळाली तेव्हा प्रारंभी साशंक होतो. बीडविषयी उगाच गैरसमज पसरवण्यात आले आहेत हे येथे काम केल्यानंतर लक्षात आले. बीडचे लोक अतिशय चांगले आहेत. मला सेवाकाळात काहीही अडचण आली नाही. आजवरच्या माझ्या वाटचालीत माझे गुरुजन, कुटूंबीय यांचे मोठे योगदान राहीले आहे. मला पहिली पोस्टींग भूम येथे मिळाली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत मी माझ्या कामाप्रती शंभर टक्के एकनिष्ठ राहिलो, झोकून देऊन काम केले. त्याचेच फ ळ मला मिळत गेले. आज कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त होत असतांना मी माझ्या कामावर समाधानी आहे. विशेषतः कोरोना काळात रुग्णसेवेसाठी योगदान देता आले. तशा कठीण प्रसंगात आम्ही कोविड सेंटरसाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. बीडमध्ये रुजू झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील चिंचोली येथील पुलाचा प्रश्‍न समोर आला. त्या ठिकाणी मुलांना पाण्यातून शाळेत जायची वेळ येत होती. त्या ठिकाणी मी स्वतः भेट देवून पायी चालत गेलो. कंत्राटदाराला सूचना करताच त्याने कोणतेही आढेवेढे न घेता पर्यायी व्यवस्था करुन दिली. बांधकाम विभागात काम करतांना रस्त्यावरील खड्डे कमी करण्यासाठी माझे प्राधान्य असायचे. खड्ड्यामुळे अपघात झाल्यास संबंधीत व्यक्तीच्या कुटूंबाला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, याची जाणीव मी कायम ठेवली. यातूनच आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात खड्डेमुक्त रस्ते केले होते. बांधकाम विभागातील अधिकार्‍यांनी रस्त्यांच्या प्रश्‍नावर विशेष लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षाही गपाट यांनी व्यक्त करत सत्कार सोहळ्याबद्दल सर्वांचे आभार मानले. 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यु.बी.झगडे यांनी विलास गपाट यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या सेवाकाळात अतिशय चांगले काम केल्याचे म्हटले. कार्यकारी अभियंता अनिल सगर, प्रविण मार्कंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन कल्याण कुलकर्णी यांनी केले तर आभार योगेश कुलकर्णी यांनी मानले.


पहिले लग्न नोकरीबरोबर

कार्यक्रमात सौ.शैलजा विलास गपाट यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, माझे लग्न तुझ्या आधी नोकरीबरोबर झाले आहे असे गपाट साहेबांनी सांगितले होते. लग्नानंतरपासून आजपर्यंत त्यांनी कायम सेवेला प्राधान्य दिलेले आहे. कामाच्या व्यापामुळे रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी 10 वाजता साहेब ऑफि सला हजर राहणार म्हणजे राहणार. त्यांच्या या सेवावृत्तीमुळे अनेकदा कुटूंबाला वेळ देता आला नाही. पण आज आपण सर्वजण या ठिकाणी एव्हढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी केलेल्या कामाची पावतीच दिली असल्याचे सौ.गपाट म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा