Subscribe Us

header ads

उमरद खालसा येथे रोडवर साचलेल्या पाण्याला तलावाचे स्वरूप

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

उमरद खालसा येथे रोडवर साचलेल्या पाण्याला तलावाचे स्वरूप



वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड तालुक्यात पाऊसाळा सुरु झाल्यापासून बऱ्याच गावात कच्चा रस्ता असल्याने रस्ते पूर्ण चिखलाने माखले आहेत बऱ्याच गावात पुल. रोड नसल्याने गावातून बाहेर निघणे मुश्किल झाले आहे. बीड 

च्या जवळ असणारे मौजे उमरद खालसा येथे डांबरी रोड वर ५० ते ६० फूट इतक्या लांब गुडघ्या पर्यंत पाणी साचत आहे. दुरून पहिलं तर एक छोटा तलाव असल्यासारखे वाटते गूडघ्या पर्यंत पाणी साचल्याने गाडी चालवताना 

खाली रस्ता दिसत नाही रस्ता दिसत नसल्याने अनेक लोक मोटार सायकल वरून  पडत आहेत. या रोडवर भरपूर रहदारी असल्याने या भागातील नागरिक या साचलेल्या पाण्यातून कसा बसा रस्ता कडून बीड कडे येत आहेत. तरी साचलेले पाणी योग्य जागेवर काढून देऊन नागरिकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी गावकरी करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा