Subscribe Us

header ads

नायब तहसीलदार आशा वाघ हल्लाप्रकरणी पती मेहबुब यांना खंडपीठात जामिन मंजुर

बीड स्पीड न्यूज 


नायब तहसीलदार आशा वाघ हल्लाप्रकरणी पती मेहबुब यांना खंडपीठात जामिन मंजुर 


केज | प्रतिनिधी-: केज तहसीलचे नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावरील हल्‌ल्याप्रकरणी त्यांचे पती मेहबुब शेख यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर जी अवचट यांनी जामिन मंजुर केली आहे.दिनांक 06.06.2022 रोजी केज तहसीलचे नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर तहसील कार्यालयामध्ये कोयत्याने झालेल्या जिवघेणा हल्ला प्रकरणी पोलिसांनी त्यांचे सख्खे भाऊ मधुकर वाघ यांन अटक करून दिनांक 07.06.2022 रोजी आशा वाघ यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात भादंविचे कलम 307, 353, 333 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मात्र दिनांक 11.06.2022 रोजी आशा वाघ यांनी पुरवणी जबाबमध्ये त्यांचे पती मेहबुब शेख यांचा नाव घेतल्याने त्यांना दिनांक 23.06.2022 रोजी अटक करण्यात आली होती. मेहबुब यांचा सत्र न्यायालय, अंबाजोगाई यांनी जामीन अर्ज फेटाळला होता.म्हणून मेहबुब यांनी ॲड. सईद एस शेख यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील अर्जात मेहबुब यांच्यावतीने म्हटले आहे की सन 2004 मध्ये आशा वाघ यांचा विवाह मेहबुब यांच्यासोबत झालेला आहे. त्यानंतर मेहबुब यांची मदत व प्रोत्साहनामुळे आशा ह्या नायब तहसीलदार पदावर नियुक्त झाल्या. सन 2014 मध्ये आशा वाघ यांची केज येथे बदली झाल्यावर त्यांनी धम्मपाल गायकवाड उर्फ बंटी या विवाहित इसमासोबत अनैतिक संबंध स्थापित केले. त्यामुळे मेहबुब व आशा वाघ यांच्यामध्ये वाद-विवाद सुरु झाले. तसेच आशा वाघ यांना त्यांच्या अनैतिक संबंधामध्ये बंटी गायकवाडमार्फत दिनांक 21.03.2021 रोजी एक मुलगी जन्मास आली. दरम्यान आशा वाघ यांचा जमीन / मिळकती संदर्भात त्यांचे सख्खे भाऊ मधुकर वाघ यांच्यासोबत वाद सुरु झाला. ज्यामध्ये दिनांक 06.06.2022 रोजी त्यांच्यावर तहसील कार्यालयात जिवघेणा हल्ला झाला व त्याच दिवशी घटनास्थळावरून त्यांचे सख्खे भाऊ मधुकर वाघ यांना पोलिसांनी अटक करून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र घटनेच्या तब्बल 06 दिवसानंतर दिनांक 11.06.2022 रोजी आशा वाघ यांच्यावतीने पुरवणी जबाबाद्वारे सदरील गुन्ह्यात मेहबुब शेख यांना गोवण्यात आलेले आहे. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्व पक्षांचे युक्तीवाद ग्राह्य धरून खंडपीठाने अर्जदारास जामिन मंजुर केली आहे. अर्जदार / आरोपींच्यावतीने अॅड.सईद एस शेख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. इम्तियाज ए शेख (केज) यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा