Subscribe Us

header ads

आदरणीय श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्यस्थीने बीड जिल्हा प्रशासन जागे झाले अखेर तीन दिवसाच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध लढ्याला यश आले.

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई प्रतिनिधी शेख फेरोज


आदरणीय श्रदेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मध्यस्थीने बीड जिल्हा प्रशासन जागे झालेअखेर तीन दिवसाच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध लढ्याला यश आले.

अंबाजोगाई|प्रतिनिधी-: बन्सारवळा येथील मयत देविदास काळे पारधी बांधव यांचा सोनपेठ पोलिसांच्या ताब्यात मारहाणीत मृत्यू झाला. #शिरसाळा पोलीस स्टेशन हद्दीत प्रेत टाकण्यात आले.आणि शिरसाळा पोलीस अधिकारी यांनी मयताचे नातेवाईक यांच्या परस्पर मयत देविदास काळे यांचे अंबाजोगाई SRTR हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदन केले. हा प्रकार सर्व संशयस्पद असल्याने व हे शव विच्छेदन आम्हला मान्य 

नाही.असे नातेवाईक यांनी जिल्हा प्रशासनाला वांचित बहुजन आघाडी च्या निवेदाद्वारे मागणी केली, व त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला या निवेदनाची दखल घेऊन मयताचे शव विच्छेदन औरंगाबाद येथे त्री सदस्य समिती च्या द्वारे कॅमेरा अंतर्गत करावे असे प्रशासनाला आदेश देण्यात आले.हा लढा वांचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, शहर अध्यक्ष गोविंद मस्के, जेष्ठ मार्गदर्शक आदरणीय ऍड विलास लोखंडे, वंचित चे युवा नेते प्रवीण शिंदे, जिल्हा 

संघटक परमेश्वर जोगदंड, तालुका प्रसिध्दी प्रमुख सतिश सोनवणे,तालुका संघटक लखन बलाढे, वंचित आरोग्य विभाग प्रमुख चंद्रकांत सरवदे भाऊ, निकेश जगदाळे, पारधी समाज प्रमुख दिलीप काळे, मयताची पत्नी सुनंदा ताई देविदास काळे, यांनी सर्वांनी संयमाने व लोकशाही मार्गाने लढला व सर्वांनी यशस्वी केला.यात मोलाचे सहकार्य वरिष्ठ स्तरावरून वांचीतचे राज्याचे उपाध्यक्ष प्रा. किशन चव्हाण सर, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे साहेब, यांनी आणि सर्व प्रसिध्दी माध्यमाने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा