Subscribe Us

header ads

शालेय प्रवेशासाठीच्या प्रमाणपत्रा करीता आठ दिवसांपासून पालक-विद्यार्थ्यांच्या चकरा

बीड स्पीड न्यूज 

शालेय प्रवेशासाठीच्या प्रमाणपत्रा करीता आठ दिवसांपासून पालक-विद्यार्थ्यांच्या चकरा
  
तहसील प्रशासनाचा मनमानी कारभार कधी थांबणार ? संभाजी ब्रिगेडचा सवाल

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) गेल्या आठ-दहा दिवसापासून सर्वसाधारण वर्गातील पालक व विद्यार्थी इडब्ल्यूएस प्रमाणपत्र साठी तहसील कार्यालयाला चकरा मारत आहेत पण प्रमाणपत्र मिळत नाही. ही तहसील प्रशासनाची पिळवणूक व मनमानी कारभार असल्याचा स्पष्ट आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वर डाऊन किंवा नेट प्रॉब्लेम सह इतर कारणे सांगून इडब्लूएस प्रमाणपत्राला अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार राहील ? हा मनमानी कारभार तहसील प्रशासनाने तात्काळ थांबून लवकरात लवकर प्रमाणपत्र देण्यात यावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे ए डब्ल्यू एस प्रमाणपत्र सह इतर प्रमाणपत्र काढायला खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान व मानसिक खचीकरण होत आहे. ही बाब खूप गंभीर असून तहसील प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेऊन तात्काळ मार्ग काढावा व विद्यार्थ्यांना व पालकांना लवकरात लवकर इडब्ल्यूएस व इतर चे प्रमाणपत्र देऊन सहकार्य करावे. असे आवाहन सुद्धा संभाजी ब्रिगेडचे वतीने तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा