Subscribe Us

header ads

बीडमध्ये साहित्यसम्राट गौरव महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद!

बीड स्पीड न्यूज 


बीडमध्ये साहित्यसम्राट गौरव महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद!

अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर आधारित सादर झाले लघुपट



बीड / प्रतिनिधी-: साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवार दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होत आहे. अवघ्या राज्याला आदर्श निर्माण करुन देणाऱ्या या साहित्यसम्राट गौरव महोत्सवात विविध परिवर्तनिय कार्यक्रमांची रेलचेल होणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी या महोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित एकूण ३५० लघुपट आले होते. त्यापैकी २५ लघुपटांची निवड करून ते दाखविण्यात आले.  बीडमध्ये साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात गुरुवार (दि.२८) रोजी झाली. या  महोत्सवाचे उदघाटन साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख आकर्षण सिनेअभिनेत्री रसिक चव्हाण, पेठ बीड विकास कृती समिती अध्यक्ष अमृत सारडा, प्रमुख उपस्थितीत प्रेमलताताई चांदणे, अ‍ॅड. अविनाश गंडले, शिक्षक नेते उत्तम पवार, भाजपाचे सलीम जहांगीर, नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक गणेश वाघमारे, वंचितचे शिवराज बांगर, नगरसेवक विलास विधाते, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बाळू गुंजाळ, नगरसेवक मच्छिंद्र जोगदंड, टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे बीड प्रतिनिधी महेंद्र मधुकर, दैनिक पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, सुभाष लोणके, प्रमुख पाहुणे म्हणून वंचितचे अनिल डोंगरे, भाजपाचे अजय सवाई, वडार समाज नेते शंकर विटकर, मनोज डरफे, बसपाचे प्रशांत वासनिक, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, चित्रपट निर्माता तथा निमंत्रक सतीश विटकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले. या साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवातीळ कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट गौरव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, चित्रपट निर्माता तथा निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे.  



असे होणार कार्यक्रम

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवार (ता.२९) रोजी सायंकाळी ६ वाजता  लहुजी वस्ताद शरीरसौष्ठव स्पर्धा. शनिवार (ता.३०) रोजी सायंकाळी ५ जवाजता सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा  गाणे अण्णाभाऊंचे हा कार्यक्रम होणार आहे. आण्णाभाऊ साठे सभागृह येथे रविवार (३१) रोजी सकाळी ११ वाजता ५०० महिलांना साड्यांचे वाटप. सोमवार (ता.१) ऑगस्ट रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढली जाणार आहे.



वेधून घेतले लक्ष

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात साहित्यसम्राट गौरव महोत्सव पार पडतो आहे. त्या अनुषंगाने प्रांगणात आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यांचे फलक लावण्यात आले आहेत.त्यामुळे येथील वातावरण प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत बीडच्या चळवळींसाठी हा महोत्सव ऊर्जा ठरत आहे.अजिंक्य चांदणे आणि चित्रपट निर्माता सतीश विटकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव संपन्न होतो आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा