Subscribe Us

header ads

मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गीत संगीताचा मोफत कार्यक्रम; एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम

बीड स्पीड न्यूज 



मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गीत संगीताचा मोफत कार्यक्रम; एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम



बीड (प्रतिनिधी) -  चित्रपटसृष्टीत अनेक भाषांमधून गीते गाऊन अजरामर झालेले महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची ३१ जुलै रोजी ४२ वी पुण्यतिथी जगभरातील गीत-संगीताचे दर्दी रसिक साजरी करतात. गेल्या वर्षी प्रमाणे यावेळीही बीड शहरात येत्या रविवारी ३१ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एक शाम मोहम्मद रफी सहाब के नाम या गीत संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन गायक एम.एम. शेख यांनी केले असून गीत-संगीत रसिकांनी या मोफत कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मंत्रमुग्ध व्हावे असे आवाहन केले आहे.महान गायक मोहम्मद रफी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये एम.एम. शेख, आकाश जाधव, श्याम माने, संध्या जाधव, निशा उजगरे, शेख मझहरुद्दीन, रतन सवाई, भास्कर वडमारे, महेश पाटील आदी गायक सहभागी होणार आहेत. प्रताप धन्वे, दीपक कांबळे, शकुंतला ससाणे हे व्यवस्थापन पाहणार आहेत. कृष्णा पांगरे यांच्याकडे ध्वनी संयोजनाचे कार्य आहे. अशा या संस्मरणीय गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात येत्या रविवार दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून गीत-संगीत रसिकांनी मंत्रमुग्ध व्हावे. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा गायक एम.एम. शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा