Subscribe Us

header ads

मुक्ताईनगर येथील हतनूर धरणाचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे-किस्किंदा पांचाळ

बीड स्पीड न्यूज 


मुक्ताईनगर येथील हतनूर धरणाचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे-किस्किंदा पांचाळ

बीड (प्रतिनिधी) -मुक्ताईनगर जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस झालेला असून त्यामुळे हतनूर धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत.हतनूर धरणातून जास्तीचे पाणी वाहून जात आहे.ते पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटना महिला प्रदेशाध्यक्षा किस्किंदा पांचाळ यांनी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्रीपद फडवणीस व विरोधीपक्ष नेते माजी उपमुख्यमंत्रीपद अजितदादा पवार आणि माजीमंत्री आ.गिरीष महाजन यांना मेलद्वारे व निवेदनाव्दारे करण्यात आली आहे वरणगांव तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत येणारे ओझरखेडा धरणाची पातळी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात कमी होऊन शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव असल्याने या धरणाची पाणी पातळी कमी झाली असता, शेतक-यांना पाणी मिळण्यास अडचणी येत असून त्यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागते.सध्या चांगला पाऊस पडत असून हतनूर धरणातून पाणी वाहून जात आहे.जर हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर पुढील काळात धरणाची पातळी चांगली राहून धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना पुरेसे पाणी मिळून अडचणी येणार नाहीत.हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे.याबाबत मागील अनेक वर्षांपासून वेळोवेळी मागणी करून सुध्दा पाणी सोडण्यात आले नव्हते.शेवटी सप्टेंबर महिन्यात दोन दिवसांसाठी पाणी सोडण्यात आले होते.त्यामुळे शेतक-यांना खूप त्रास झाला होता.तरी राज्य सरकारने यांचा व शेतकरी बांधवाचा विचार करून हतनूर धरणातील पाणी ओझरखेडा धरणात सोडून शेतकर्‍यांना न्याय द्यावा,अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा किस्किंदा पांचाळ मा.मुख्य मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ई-मेल द्वारे करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा