Subscribe Us

header ads

आ.क्षीरसागरांकडून शहराचे विकास पर्व सुरू पावणे दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ; कामांना सुरुवात

बीड स्पीड न्यूज 


आ.क्षीरसागरांकडून शहराचे विकास पर्व सुरू
पावणे दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ; कामांना सुरुवात



बीड दि.१६ (प्रतिनिधी):- सलग तिसर्‍या दिवशीही आ.संदीप क्षीरसागर यांनी शहरातील मंजूर असलेल्या विकास कामांचे उद्घाटन करून शुभारंभ केला.या कामांना त्याच क्षणी सुरूवात करण्यात आली.शनिवार (दि.१६) रोजी खासबाग येथील फ्रुट मार्केट व शहरातील इतर ठिकाणी जाऊन आ.संदीप यांनी शुभारंभ केला.बीड मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या 

आमदार निधी व शासनाच्या इतर लेखा शिर्षातून, आपल्या पाठपुराव्याने अनेक विकासकामे मंजूर करून त्यांना सुरूवात केली आहे.त्यापैकी,बीड शहरातील विविध भागात दौरा करून आ.संदीप क्षीरसागर यांनी विकास कामांचा शुभारंभ करून त्या कामांची प्रत्यक्ष सुरुवात केली.शुक्रवार (दि.१५) रोजी शहरातील प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक १३ मध्ये जाऊन ४ कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन केले.त्यानंतर शनिवार (दि.१६) रोजी शहरातील खासबाग येथील फ्रुट मार्केटमध्ये विविध सुविधा पुरविणेसाठी ५० लक्ष रूपये, 

भगवान बाबा प्रतिष्ठाण जवळील नगरपरिषदेच्या जागेत सभामंडप बांधणेसाठी १० लक्ष रूपये,खडकपुरा येथे रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी ५० लक्ष रूपये,बाबा चौक परिसरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी २४ लक्ष रूपये,प्रभाग क्रमांक १७ मध्ये बारादरी जवळील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी ५ लक्ष रूपये,भोले बाबा मस्जिद जवळ सभागृह बांधणेसाठी १० लक्ष रूपये,कंकालेश्वर मंदीराच्या बाजूस सभागृह बांधणेसाठी ५ लक्ष रूपये,कंकालेश्वर मंदीराच्या पाठीमागे लिंगायत वाणी समाजाच्या 

स्मशानभूमी परीसरात संरक्षण भिंत बांधणेसाठी ५ लक्ष रूपये,धनगरपूरामधील रस्ता कामासाठी ५ लक्ष रूपये,पांडु भालशंकर रोड ते हनुमान मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी ७ लक्ष रूपये, अशा एकूण १ कोटी ७१ लाख रूपयांच्या कामांचे उद्घाटन शनिवार (दि.१६) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित मान्यवर व स्थानिक नागरिक यांच्या हस्ते केले.या कामांना उद्घाटनानंतर लगेच सुरूवात करण्यात आली.यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे, वैजनाथ तांदळे आदींसह स्थानिक नागरिक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा