Subscribe Us

header ads

भाजपच्यावतीने बीड नगरपालिकेविरोधात खड्डयात बसून आंदोलन

बीड स्पीड न्यूज 


भाजपच्यावतीने बीड नगरपालिकेविरोधात खड्डयात बसून आंदोलन

बीड|प्रतिनिधी-:  शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता आदी समस्यांचे मुद्दे घेऊन बीड शहर भाजपच्यावतीने पालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी पावसाचे पाणी साचलेल्या खड्डयात बसून आपला रोष व्यक्त केला. तसेच आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.बीड पालिकेवर गत ३५ वर्षांपासून क्षीरसागर बंधूंची सत्ता आहे. परंतु तरीही शहराचा विकास झालेला नाही. पालिकेला आलेल्या ५५० कोटी रुपयांचा निधीही श्रेयवादात कंत्राटदाराने पळविला, अमृत अटल आणि भुयारी गटार योजनाही रखडलेल्या आहेत. त्या कार्यान्वित झाल्या असत्या तर रस्त्यांवर पाणी साचले नसते, शिवाय पाण्याचा प्रश्नही मिटला असता. ठराविक प्रभागांमध्येच कामे केली जातात. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे डोळेझाक केल्यामुळे संपूर्ण बीडवासीयांनासमस्यांनी घेरले. या सर्व समस्या दूर करण्याच्या मागणीसाठी भाजपने शनिवारी सकाळी मोंढ्यात आंदोलन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर, शहराध्यक्ष भगिरथ बियाणी, नवनाथ शिराळे, जगदीश गुरुखुदे, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, कपिल सौदा, नागेश उपस्थिती होती.
पवार, विलास बामणे, अनिल चांदणे, भूषण पवार, बालाजी पवार, संगीता घसे, शैलजा मुसळे, छाया मिसाळ, लता मस्के, संध्या राजपूत, शीतल राजपूत, मीरा गांधले, प्रीत कुकडेजा, मुसाखान, नूर लाला, प्रथमेश भालेराव, सचिन तिपटे, विशाल खाडे, सुभाष चव्हाण, भारत वाघमारे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा