Subscribe Us

header ads

गुटखा वाहतूक करणारी कार ताब्यात; लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख रुपये जप्त

बीड स्पीड न्यूज 


गुटखा वाहतूक करणारी कार ताब्यात; लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख रुपये जप्त



बीड|प्रतिनिधी-: शहरालगतच्या कुर्ला रस्त्यावर गुटखा वाहतूक करणारी कार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतली. आज दि. 16 जुलै रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. कारवाईत चालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत गुटखासह कार आणि गुटखा विक्री केलेले नगदी सहा लाख रुपये, मोबाईल, असे साहित्य मिळून आले असा तब्बल 16 लाख 85 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गोविंद नवनाथ खांडे (26, रा. पिंपळगाव मजरा ता. जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या कार चालकाचे नाव आहे. कुर्ला रोडवर एक इसम कारमध्ये क्रमांक (एम. एच. 24 ए.एच.3482) गुटखा वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळे पथके तयार करून कुर्ला रोडवर सापळा रचला. या ठिकाणी 16 जुलै रोजी पहाटे 3.30 सुमारास एक कार आलेली दिसली. पोलिसांनी ती कार थांबवून चालकास त्याचे नाव गाव विचारले असता गोविंद नवनाथ खांडे 
(वय 26 वर्षे, रा. पिंपळगाव मंजरा) असे त्याने सांगितले. त्यानंतर गाडीत त्याचा साथीदारही होता. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात गुटखा व गुटख्यात मिसळण्याचा पदार्थाच्या गोण्या असा 5 लाख 74 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. तसेच 5 लाख रूपयांची कार आणि गुटखा विक्री केलेले नगदी सहा लाख रुपये दोन मोबाईल असा एकूण 16 लाख 85 हजार 750 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
याप्रकरणी पेठ बीड पोलिस ठाण्यात कलम 328, 272, 273, 188, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय ज्ञानेश्‍वर कुकलारे, पीएसआय भगतसिंग दुल्लत, पो.हे.कॉ.मनोज वाघ, नसीर शेख, रामदास तांदळे, मोहन क्षीरसागर, पोलिस नाईक विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, अशोक दुबाले, गणेश हंगे, चालक अशोक कदम आणि अतुल हराळे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.













लाखोंचा गुटख्यासह नगदी सहा लाख जप्त

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा