Subscribe Us

header ads

रोटरी क्‍लब ऑफ बीडचा सोमवारी पदग्रहण सोहळा

बीड स्पीड न्यूज 

रोटरी क्‍लब ऑफ बीडचा सोमवारी पदग्रहण सोहळा

अध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी, सचिवपदी सुनिल जोशी यांची निवड

बीड|प्रतिनिधी-: रोटरी क्‍लब ऑफ  बीडच्या नुतन कार्यकारिणीचा सोमवार दि.18 जुलै रोजी पदग्रहण समारंभ आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी रो.कल्याण कुलकर्णी हे अध्यक्षपदाची तर रो. सुनिल जोशी हे सचिवपदाची जबाबदारी स्विकारणार आहेत. यावेळी गोवा राज्याचे लोक आयुक्त श्री.अंबादासराव जोशी, रो.हरिश मोटवाणी, सीईओ अजित पवार, सहाय्यक प्रांतपाल अशोक बजाज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हॉटेल अन्विता येथे सायंकाळी 6.30 वाजता होणार्‍या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रोटरी क्‍लब ऑफ  बीड 37 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागील 36 वर्षात रोटरी क्‍लबने विविध सामाजिक कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. हे कार्य अविरतपणे पुढे सुरु ठेवण्यासाठी क्‍लबच्या अध्यक्षपदी रो.कल्याण कुलकर्णी व सचिवपदी रो.पी.पी. सुनिल जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासह रो.डॉ.रमेश घोडके, रो.गणेश मुळे, रो.सुनिल खंडागळे, रो.मुकूंद कदम, रो.संदिप खोड, रो.संतोष पवार, रो.ओमप्रकाश लोहीया, रो.राजेंद्र मुनोज, रो.राम मोटवाणी, रो.अक्षय शेटे, रो.डॉ.मनोज पोहनेरकर, रो.अ‍ॅड.उषाताई दराउे, रो.विकास उमापूरकर, रो.सुमित जयस्वाल या नुतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ सोमवारी हॉटेल अन्विता येथे सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास गोवा राज्याचे लोक आयुक्त अंबादासराव जोशी, माजी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर हरिश मोटवाणी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, रोटरीचे सहायक प्रांतपाल अशोक बजाज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रो.गणेश मुळे, रो.विकास उमापूरकर, प्रोजेक्ट चेअरमन रो.मुकूंद कदम, रो.सुमित जयस्वाल आदिंनी केले आहे.


डॉ.कासट, देशमुख, सौ.आवटे यांचा होणार गौरव

समाजोपयोगी कार्यातून वेगळा ठसा उमटवणार्‍या डॉ.नरेश कासट, श्री.गंगाधर देशमुख व सौ.उमा आवटे यांचा रोटरीच्या वतीने सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.  या तिनही सत्कार मूर्तींच्या कार्यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या हेतूने मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा