Subscribe Us

header ads

मंत्रीमंडळ नसताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळाची बैठक कशी काय घेवू शकता?-- ॲड. प्रा. इलियास इनामदार

बीड स्पीड न्यूज 


मंत्रीमंडळ नसताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळाची बैठक कशी काय घेवू शकता?-- ॲड. प्रा. इलियास इनामदार


बीड प्रतिनिधि: लोकशाहीचा गळा अावळून व  संविधानाची हत्या करुन मंत्रीमंडळ नसताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मंत्रीमंडळाची बैठक कशी काय घेवू शकता हे लोकशाही पद्धतीला मान्य असेल का? देशात सरकारे मनुवादी कायद्याची सर्रास अंमलबजावणी करत असताना लोकशाही प्रेमी जनता व संविधानाला माननारा भारतीय वर्ग या घटनाचा विरोध निषेध करण्या ऐवजी झोपा काढतो हे निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी प्रसिद्धि माध्यमानना दिली आहे.आज महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचा नामांतर करण्याचा निर्णय घेतला पण मंत्रीमंडळ नसताना कोणत्या बहुमताच्या आधारावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी हा निर्णय घेतला काय कळत नाही या निर्णयाने चक्क लोकशाहीचा गळा अावळलेला असून संविधानाची हत्या केलीली आहे या मनुवादी निर्णयाचा लोकसेना संघटना व महाराष्ट्रातील तमाम जनता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा जाहिर निषेध करत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लोकसेना ईमेल निवेदनाद्वारे इशारा देते की आपण नामांतराचा घेतलेला निर्णय परत घ्या नसता आम्ही राज्यातील सर्व समविचारी पक्ष-संघटना  रस्त्यावर उतरु असा इशारा या निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने दिलेला आहे.
                                  
                        
                     
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा