Subscribe Us

header ads

प्रभास केसरी समाज भूषण पुरस्काराने प्राचार्य उमा जगतकर सन्मानित

बीड स्पीड न्यूज 

प्रभास केसरी समाज भूषण पुरस्काराने प्राचार्य उमा जगतकर सन्मानित                              


बीड प्रतिनिधी/ दि. 16 बीड येथील देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल येथील गेल्या पाच वर्षापासून कार्यरत असलेल्या व उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून एम ए इंग्लिश लिटरेचर मध्ये एम. ए. उत्तीर्ण असलेल्या, व परळी येथील लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल मध्ये दहा वर्ष कार्य करून त्या बीड येथे आलेल्या  प्राचार्य उमा जगतकर यांचा दैनिक प्रभास केसरी प्रथम वर्धापन दिना निमित्त प्रभास केसरी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं या प्रसंगी दैनिक प्रभास केसरीच्या संपादिका अनुप्रिता मोरे, मुख्य व्यवस्थापक प्रा.डॉ.रमेश लांडगे साप्ताहिक अक्षरधाम चे संपादक बालाजी जगतकर, उद्धव अहिरे, सह शाळेतील शिक्षक,शिक्षक इत्तर कर्मचारी उपस्थित होते, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच त्यांनी सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धेत कसे यश संपादन करायचे ही शिकवण दिली आहे त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये विजेते ठरले आहे. त्यांनी कमी कालावधी मध्ये बीड शहरात एक वेगळी छाप सोडले त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांना कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आला आहे त्यामुळे देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा