Subscribe Us

header ads

जि.प.व प.स.सदस्यांनी माजलगाव मंजरथ रस्त्याची वाट लावली मतदार त्यांची जागा दाखवणार —अशोक ढगे

बीड स्पीड न्यूज 


जि.प.व प.स.सदस्यांनी माजलगाव मंजरथ रस्त्याची वाट लावली मतदार त्यांची जागा दाखवणार —अशोक ढगे

माजलगाव प्रतिनिधी -: शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पुर्वे कडून शासकीय धान्यांच्या गोडाऊन पासुन जाणारा माजलगाव ते मंजरथ हा पक्का रस्ता गेल्या तीस,पस्तीस वर्षा पुर्वीचा असुन माजलगाव तालुक्यातील मनुर,मनुरवाडी, डेपेगाव,लुखेगाव, गोविंदपुर, सांडसचिंचोली ,आळसेवाडी, मंजरथ या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे.  याच रस्त्यावर लागणारे गावे शासनाकडून तिर्थक्षेत्र म्हणून मनूर येथील देविचे उपपीठ रेणूका माता व मंजरथ येथील प्रसिद्ध  मंदिरे व घाट हे दक्षिण काशी म्हणून घोषित केलेले आहे. जवळपास गेल्या दहावर्षा पासुन या रस्त्याची जि.प.बांधकाम विभागाकडून दुरुस्ती अथवा डागडूजी झाली नसल्याने अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आहे .दरम्यान च्या काळात थोडीफार डागडूजी करून बिले उचलण्याचे पाप काही नेत्यांनी केलेले आहे.ज्या लोकप्रतिनीधिना   येथिल नागरीकांनी भरघोस मताधिक्यांनी निवडूण दिले ते पंचायत समिती व जि.प. सदस्य यांनी पाच वर्षात या मतदार संघात ढूंकूण सूद्धा पाहिले नाही.किमान आमदार साहेबांनी तरी विषेश भर घालून हे रस्ते बनवायला हवे होते,काही मोजक्याच ठिकाणि एक कि.मि.अथवा दोन कि.मि.चा रस्ता बनवून गूत्तेदार व नेत्यांचे भले केले आहे.जे रस्ते बनवले ते पूर्णपणे बोगस एकाच पावसात रस्ता उखडला, या रत्यावर  हात हात भर खड्डे असून वाहनधारकांची व नागरीकांच्या कमरेचे तिनतेरा वाजून वल्हेवाट लागली आहे. एखादा रूग्ण जर दवाखाण्यात अणावयाचा झाला तर अवघ्या पंधारा मिनिटात माजलगावला येण्याचा रस्ता असताना चक्क अर्धा किंवा एक तास लागतो.या रस्त्याकडे कोणीच लक्ष देत नसून भावी प.स.व जि.प. सदस्यांनी  विचार करूणच मतदारां पर्यत पोहचावे असे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पञका मध्ये म्हटले आहे.तसेच के.जी.दालमील च्या जवळ असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुल खराब व कमी उंचीचा असल्याने चारचाकी वाहनांना त्यावरून येणे जाणे धोकादायक झाले आहे.  त्या नाल्यातील घाण पाणी आजुबाजुला असलेल्या नागरीवस्ती मध्ये घुसत असल्याने त्याभागातील नागरिकांच्या आरोग्य  धोक्यात येवू शकते. चिखलमय रस्ते,खड्डेमय रस्ते व अरूंदपुल अंरुद आहेच पण संरक्षण कठडे पण नाहीत.भावी जि.प.व प.स. सदस्यांनी निर्णायक पाऊल उचलूनच मतदारसंघात मिरवावे.अन्यथा मतदार तूमची जागा दाखवल्या शिवाय स्वस्त बसणार नाही.असे अवाहन दिलेल्या प्रसाद्धि पञकान्वये अशोक ढगे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा