Subscribe Us

header ads

तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथे फ्रेशर डे उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथे फ्रेशर डे उत्साहात साजरा

महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी केले मार्गदर्शन



बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर डे चे आयोजन दि.२७ जुलै रोजी सकाळी १० वाजता तुलसी सभागृह येथे करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून प्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.  प्राचार्य निकाळजे यांनी आय.टी क्षेत्रातील संधी या विषयावर बीसीए,बीसीएस आणि बी.एससी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी एच.ओ.डी प्रा.डॉ योगिता लांडगे,प्रा.डॉ.विकास वाघमारे,प्रा.समीर मिर्झा,प्रा.विवेक जोगदंड,प्रा.अंकुश सुर्वे यांची विचार मंचावर उपस्थिती होती.पुढे बोलताना प्राचार्य निकाळजे म्हणाले की,संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान या विषयात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.१२ वी पास झाल्यानंतर काय? हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो.आयटी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध 

होतात.विद्यार्थी बीसीए,बीसीएस आणि बीएससी डिग्री पास झाल्या नंतर विविध कंपन्यांसह  सरकारी नोकरी,बँक आदी ठिकाणी नौकरी करू शकतो.स्वतःचा व्यवसाय टाकू शकतो तथा मोठा उद्योजक बनू शकतो. तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात डिग्री पास झालेले विद्यार्थी आज विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत तसेच सरकारी नोकरी मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. यामुळे संस्थेचे नाव उज्वल होत आहे. असे प्राचार्य डी.जी.निकाळजे यांनी बोलताना सांगितले. फ्रेशर डे निमित्त महाविद्यालयामध्ये विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपले कला गुण सादर केले. फ्रेशर डे यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी प्रा.सुरज वक्ते,प्रा.राहुल सोनवणे,प्रा.भारत उघडे,प्रा.किशोर वाघमारे,प्रा.दुर्गे,प्रा.अमोल किरवले,प्रा.डॉ.भाग्यश्री पवार,प्रा.शिल्पा बोराडे,प्रा.स्वाती साबळे, प्राची पाठक, कर्मचारी बबन पांचाळ,प्रवीण रांगदळ,संतोष चव्हाण,संजय धुरंधरे,विशाल रोडे, सुदर्षणा वीर आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा