Subscribe Us

header ads

बॉडीबिल्डिंग स्पर्धेने वेधले तरुणाईचे लक्ष

बीड स्पीड न्यूज 


बॉडीबिल्डिंग स्पर्धेने वेधले तरुणाईचे लक्ष

साहित्यसम्राट महोत्सव : कार्यक्रमांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद







बीड / प्रतिनिधी-: साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये साहित्य सम्राट गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवार दि. २८ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी या महोत्सवात लहुजी उस्ताद जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.या महोत्सवाला दुसऱ्या दिवशी देखीलउत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवातील बॉडीबिल्डिंग स्पर्धेने तरुणाईचे लक्ष वेधले. डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे आणि चित्रपट निर्माता सतीश विटकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव संपन्न होतो आहे.बीडमध्ये साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार (दि.२९) रोजी बॉडीबिल्डिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन तहसीलदार सुहास हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी राजयोग फाउंडेशनचे शुभम धूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शेख शफिक, डॉ. सय्यद मसिह, डॉ.सय्यद अरशियान उल्लाह तर प्रमुख उपस्थितीत सुभाष लोणके,सनी आठवले, सुनिल पाटोळे, रवी वाघमारे, डॉ.योगेश साठे, महेश धांडे, सनी वाघमारे, राहुल गवळी यांची उपस्थिती होती. या साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवातील उर्वरित  कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साहित्य सम्राट गौरव महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, चित्रपट निर्माता तथा निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे. दरम्यान साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



आज होणारे कार्यक्रम !

बीड शहरातील आण्णाभाऊ साठे सभागृह येथे रविवार (३१) रोजी सकाळी ११ वाजता ५०० महिलांना साड्यांचे वाटप होणार आहे. सोमवार (ता.१) ऑगस्ट रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढली जाणार आहे.


स्पर्धकांचा झाला गौरव !

लहुजी उस्ताद जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बाजी मारणाऱ्या बॉडीबिल्डर स्पर्धकांना पन्नास हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम विभागून देण्यात आली. तसेच प्रशस्तीत्रक आणि शिल्ड देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातून स्पर्धक आले होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा