Subscribe Us

header ads

पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य: SC ने नुपूर शर्माला फटकारले, टीव्हीवरून देशाची माफी मागण्याचे निर्देश

बीड स्पीड न्यूज 

पैगंबरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य: SC ने नुपूर शर्माला फटकारले, टीव्हीवरून देशाची माफी मागण्याचे निर्देश

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले. नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असे निर्देश दिले. नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्यावर विविध राज्यांत दाखल झालेले सर्व गुन्हे दिल्लीला वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.यावर सुनावणी करताना टीव्हीवरुन देशाची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. नुपूर शर्मावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या याचिकेत नुपूरने म्हटले होते की, तिला सतत वेगवेगळ्या राज्यातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, नुपूर यांनी विधानाबद्दल माफी मागितली आहे आणि ते मागे घेतले आहे. त्यावर कोर्ट म्हणाले- त्यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.नुपूर शर्मा यांनी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलतान अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य काढले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आणि बघता बघता हा प्रश्न जागतिक पातळीवर पोहोचला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आखाती देशांनी तीव्र हरकत नोंदवली आहे. कतार, कुवैत व इराणने या विधानाप्रकरणी भारतीय राजदुतांना नोटीस बजावली आहे. विशेषतः कतार व कुवैतने तर भारत सरकारकडे या प्रकरणी माफी मागण्याचीही मागणी केली आहे. तर सौदीने या प्रकरणी केवळ आक्षेप नोंदवला आहे. सौदी अरेबिया, कुवैत, बहारीन व अन्य अरब राष्ट्रांनी आपल्या सुपर स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या भारतीय उत्पादनांवर बंदीही घातली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा