Subscribe Us

header ads

नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

बीड स्पीड न्यूज 


नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


बीड (प्रतिनिधी) - शहरातील जुना बाजार भागात असलेल्या नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत २७ जून २०२२ रोजी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभामध्ये इयत्ता दहावीतील तीन गुणवंत विद्यार्थिनी शेख सिमरन दिलावर ८६.२०%, द्वितीय सय्यद सबा सय्यद खैसर ८४.२१% तृतीय अल्फिया बेगम शेख चाँद ८४% या विद्यार्थिनी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या  विद्यार्थ्यांपैकी प्रथम शेख मुहम्मद आफरीन मुहम्मद युनुस ८०.३३%, द्वितीय आयेशा फिरदोस सय्यद मोईन ७९.३३%, तृतीय सय्यद फिरदोस तनजीम सय्यद मोईन ७८.६७% या तीन विद्यार्थिनींचे सत्कार शाळेच्या प्रांगणात शाळेचे प्राचार्य सिद्दिकी नवीद यांच्या हस्ते ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य सिद्दिकी नवीद म्हणाले की, आमचे विद्यालय विद्यार्थी घडविणे हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून आम्ही शिक्षण देत आहोत ज्यामुळे आजचे विद्यार्थी हे उद्या देशाचे आधारस्तंभ होणार असतात म्हणून दूरदृष्टीने विचार करूनच आम्ही शाळेत चांगल्या शिक्षणासह संस्कार, शिस्त देऊन त्यांचा शैक्षणिक व सामाजिक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा