Subscribe Us

header ads

बीड स्पीड च्या दणक्याने वार्ड क्रमांक 11 मध्ये मुरूम टाकण्यास सुरुवात

बीड स्पीड न्यूज 



बीड स्पीड च्या दणक्याने वार्ड क्रमांक 11  मध्ये मुरूम टाकण्यास सुरुवात


बीड | प्रतिनिधी-: बीड शहरात झालेल्या पावसाने शहरांतील वार्ड क्रमांक  ११ इंद्रा गांधी शाळेच्या समोर सर्वत्र रस्त्यावर आणि नाल्याला पुराचे रूप आले होते. नाली तुंबल्या मुळे पाणी थेट रस्त्यावर येत होते. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेकडून नाली सफाई आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यांवर पाणी आले होते.पाणी साचल्याने नाली आणि रस्ता एकच झाला त्यामुळे अनेक नागरिक नाल्यामध्ये पडून अपघात घडले. मात्र, किरकोळ पावसाच्या पाण्यानेही शहरातील वार्ड क्रमांक ११ मधील इंद्रा गांधी शाळेच्या समोर नाल्या 

तुंबल्या होते. नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन अनेक विद्यार्थी नालीत देखिल पडले होतें येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाता येतं नव्हते झालेल्या गैरसोयने येथील नागरिक खुप संताप व्यक्त करत होते. चिखल झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. आणि या कामासाठी अंदाजे रक्कम ४९९५६१० मंजुर देखील करण्यात आली आहे तरी लोकप्रतिनिधी आणि नगर पालिका या वार्ड क्रमांक ११ चे काम अर्धवट करून बंद केले आहे. कामबंद का केले याची माहिती कोणाला नाही आणी याची माहिती कोणी देत ही नाही या भागाची 

होणारी गैरसोय बघुन आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचे हाल पाहून बीड स्पीड ने २९ जुलै रोजी ही बातमी प्रसिद्ध केली आणि कामाच्या नावाने उचललेल्या रखमेचा होणारा काळाबाजार उघडकीस आणला आणि याची दखल घेत इंद्रा गांधी शाळेच्या समोर नगर पालिकेने तात्पुरता मुरुम टाकून या भागांतील नागरीकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याचा वो लोकांना थोडा त्रास कमी झाला मुरुम टाकायला सुरुवात झाल्याने या भागांतील नागरिकांनीं बीड स्पीड चे आभार मानले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा