Subscribe Us

header ads

तेलगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचा 75वा वर्धापन साजरा

बीड स्पीड न्यूज 


तेलगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचा 75वा वर्धापन साजरा

नाना पाटलांची चळवळ प्रभावी उभी करण्याची गरज- कॉ काशीनाथ कापसे 

धारूर | प्रतिनिधी-:  धारुर तालुक्यात तेलगाव येथे 3 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन व क्रांतिसिंह काॅम्रेड नाना पाटील,लोकशाहीर साहित्यरत्न काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम मानवी हक्क अभियानाच्या सभागृहात घेण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक शेकापचे ज्येष्ठ नेते भाई बाबुराव जाधव हे होते तर अध्यक्षस्थानी कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉम्रेड काशीनाथ कापसे हे होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेकापचे माजी सभापती भाई संभाजी शिनगारे, गयाबाई आवाड, भाई अॅड अनिकेत भैय्या देशमुख, भाई गणपतराव कोळपे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शेकाप पक्षाचा ध्वज युवा नेते भाई मोहन गुंड यांच्या हस्ते फडकाउन झाली, या वेळी कापसे सर यांनी नाना पाटील यांच्या जुन्या आठवणी सांगत चळवळी किती प्रभावी होत्या यावर प्रकाश टाकला प्रमाणीक प्रभावी कार्यकर्ता शिबीरात घडत आसतो तरुणांना पुन्हा शेतकरी कामगार कष्टकरी वर्गाला न्याय मिळुन देण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटलाची चळवळ प्रभावी उभी कारवी लागेल अशा भावना व्यक्त केतल्या, भाई जाधव यांनी पक्षाची लढ्याच्या आठवणी सांगत पक्षाचा इतीहास क्रांतीचा असल्याचे मत व्यक्त केले, जिल्ह्यात गावा गावात शेतकरी कामगार पक्षाची टीप काम करण्यासाठी या पुढे उभी करुत सहकार्यानी कामाला लागवे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपन अनेक आंदोलने केली आहेत या पुढे ही  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक काम करु असे भाई मोहन गुंड यांनी  सांगीतले, भविष्यात तरुणांचा वैचारिक पक्ष म्हणून पक्षाकडे राजकिय समाजीक पर्याय म्हणून पाहातील या साठी आपन सर्वजन कामाला लागु पुन्हा शेकापचे गत वैभव मिळवु आशावाद अॅड अनिकेत देशमुख यांनी  व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजक अॅड नारायण गोले पाटील यांनी प्रस्ताविक पर मनोगत व्यक्त केलं  शेतकरी कामगार पक्षाची प्रतिज्ञा सर्वांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटीचे संचालक सुमंत अण्णा उंबरे, संभाजी चव्हाण यांचा मान्यवराच्या हस्ते  सत्कार  करण्यात आला.यावेळी भाई अशोक रोडे,भाई दत्ता प्रभाळे,भाई मुंजा पांचाळ,भाई सुमंत अण्णा उंबरे,भाई सिताराम बडे,भाई अमोल सावंत,भाई नवनाथ जाधव,भाई अनिल कदम, बाळासाहेब तरकसे भाई बलभीम भगत,भाई माऊली जाधव भाई महेश गायकवाड,भाई बाबाराजे गायकवाड.सह जिल्ह्यातील कार्यकर्ते  सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा