Subscribe Us

header ads

पांगरी लिंबोटा तळेगाव गावात भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टीने प्रचंड नुकसान ; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - तालुकाध्यक्ष गोविंद कराड

बीड स्पीड न्यूज 


पांगरी लिंबोटा तळेगाव गावात भागात ढगफुटी सदृश अतिवृष्टीने प्रचंड नुकसान ; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या - तालुकाध्यक्ष गोविंद कराड

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी  तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य व पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पांगरी लिंबोटा तळेगाव या गावातील भागात तर ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे परळी तालुका अध्यक्ष गोविंद कराड यांनी केले आहे.तालुक्यातील पांगरी, लिंबोटा, तळेगाव गावात नुकतीच जोरदार ढगफुटी सदर्श  अतिवृष्टी झाली,  ढगफुटीच्या घटना घडल्या. छोटया, मोठ्या नद्या,नाले दुथडी भरून वाहिल्याने शेतात पाणी घुसून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.  शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट आले. ढगफुटीने बळीराजा पुर्ण कोलमडून गेला असून त्याला मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे. पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अन्यथा आ.धनंजय मुंडे व वाल्मीक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र असे आंदोलन करण्याचा इशाराही राष्ट्रवादी युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद कराड यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा