बीड स्पीड न्यूज
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत १३ पैकी सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात
चार भाजप तर दोन शिवसेनेच्या ताब्यात, एका ठिकाणी संमिश्र
बीड -: बीड जिल्ह्यातील एकूण १३ ग्राम पंचायतीसाठी आज मतमोजणी झाली. त्यात सहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, चार ठिकाणी भाजप, शिवसेना दोन तर एका ठिकाणी संमिश्र राजकीय पक्षांचा विजय झाला आहे.अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक म्हणजे पाच ग्राम ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यात चनई, श्रीपतरायवाडी आणि दगडवाडी या ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनल निवडून आला. तर, लोखंडी सारगाव आणि मोरेवाडी या ग्राम पंचायती राष्ट्रवादी काँग्रसच्या ताब्यात गेल्या आहेत.गेवराई तालुक्यात पाच ग्राम पंचायतींची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचा चार ठिकाणी विजय झाला तर एका ठिकाणी भाजपचा विजयी झाला. सिरसमार्ग, पाचेगाव, दिमाखवाडी आणि जयराम तांडा हे राष्ट्रादीच्या ताब्यात राहिले. तर, वसंतनगर तांडा ही ग्राम पंचायत भाजपच्या ताब्यात गेली. तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. त्यात दोन ग्राम पंचायती शिवसेनेच्या ताब्यात तर एका ग्राम पंचायतीत संमिश्र राजकीय पक्षांना यश मिळाले. यात अंथरवन पिंपरी व अंथरवन पिंपरी तांडा या शिवसेनेच्या ताब्यात तर गवळवाडी ग्राम पंचायतमध्ये संमिश्र राजकीय पक्षांना यश मिळाले.
0 टिप्पण्या