Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे 75 वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे 75 वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा




वाकनाथपुर प्रतिनिधी-:भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष पूर्ण झाले भारताला स्वातंत्र्य मिळावे या साठी कित्येक विर जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावली अनेक वीर जवान शहीद झाले आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज १५ ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले ७५ वर्ष पूर्ण झाल्याने सर्व देशात अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. वाकनाथपुर येथे जि. प. प्रा.शाळा 

आणि ग्रुप ग्रामपंचायत येथे 75 आजादी का अमृत महोत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभात फेरी घेन्यात आली नंतर गावचे सरपंच घाडगे.शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पत्रकार नवनाथ गोरे, उर्दू शिक्षण समिती अध्यक्ष शेख खादिरभाई, मुख्याध्यापक गावडे सर यांचा हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून उर्दू माध्यमचे मुख्याध्यापक जलील सर यांच्या हस्ते भारतीय तिरंगा फडकविण्यात 

आला सर्वांनी भारतीय तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीताला सुरूवात करण्यात आली व नंतर शेख कलीम सर यांनी निपून प्रतिज्ञा ही सार्वजनिक घेतली व सरपंच सौ.वैशाली गोरख घाडगे, गावडे सर, कलीम सर, जलील सर, नवनाथ गोरे, शेख खादिर, खाकरे महादेव यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वही पेन वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा