Subscribe Us

header ads

माजलगाव नपचे मुख्याधिकारी, अभियंता,माजी नगराध्यक्ष यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करा-शेख रशिद

बीड स्पीड न्यूज 



माजलगाव नपचे मुख्याधिकारी, अभियंता,माजी नगराध्यक्ष यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करा-शेख रशिद


माजलगाव|प्रतिनिधी :- माजलगांव नप मध्ये भ्रष्टाचारांचा कळस गाठला आहे कित्येकदा निवेदने,आंदोलन देवुनहि मगर कातडेचे अधिकारी,सत्तेधारी मिळुन 60 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. हे भ्रष्टाचारांची संपत्ती ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.नगर पालिका राज्यभरात भ्रष्टाचार व विविध कारणाने मागील पाच वर्षांपासुन चर्चेत आलेली आहे. कचरा टेंडर,पाणी पुरवठा टेंडर , सिमेंट रस्ता मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात या पालिकेत स्वच्छता अभियंता, बांधकाम अभियंता व मुख्याधिकारी,माजी नगराध्यक्ष या चौघांनी दोन वर्षात ६० ते ७० कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केला असुन स्वच्छता निरीक्षक व भांडारपाल यांचा अहवाल न घेता बोगस बिले काढली आहे. तसेच शहरातील सिमेंट रस्तांचे थर्ड पार्टी ऑडिट व कॉलिटी कंट्रोल अहवाल न घेता बील पास करण्यात आलेले आहे. हा सर्व प्रकार करुन कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे त्यामुळे मुख्याधिकारी,अभियंता,माजी नगराध्यक्ष ह्यांच्या संपत्ती ची ईडी मार्फत चौकशी करा अशी मागणी एम आय एम चे शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा