Subscribe Us

header ads

नेकनूर पंचायत समिती गण मधून हामेद सलीम यांना उमेदवारी द्या समस्त नेकनूरकरांची मागणी

बीड स्पीड न्यूज 


नेकनूर पंचायत समिती गण मधून हामेद सलीम यांना उमेदवारी द्या समस्त नेकनूरकरांची मागणी




बीड (प्रतिनिधी) नेकनूर हे गाव जिल्ह्यातील मुख्य ठिकाण असून तेथील ग्रामस्थ आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. आजही या गावातील ग्रामस्थांना आजही गरजा पुर्ण करण्यासाठी शहराला जावे लागत आहे. या करिता यावेळेस नेकनूर पंचायत समिती गणामधून हामेद सलीम यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी एकजुटीने नेकनूर पंचायत समिती गणमधील समस्थ मतदारांनी केली आहे. 
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  नेकनूर हे बीडपासून जवळ असून मुख्य बाजारपेठ आहे परंतू या ठिकाणच्या ग्रामस्थांना आजदेखील अनेक समस्यांना विकासकामे न झाल्यामुळे तोंड द्यावे लागत असून कोणतेच काम पुर्ण झालेले नाही, ना कोणतीही मुलभूत सुविधा सत्ताधार्‍यांकडून दिल्या गेलेली नाही त्यामुळे नेकनूर पंचायत समिती गणमधील नागरिक हे विकासापासून आजही कोसो दूर असल्यााचे सांगत आहेत. त्यामुळे यावेळेस नवीन सदस्य व विकास करणारा नेता निवडून द्यावयाचा आहे. व त्यासाठी हामेद सलीम हेच योग्य असल्याचे नेकनूरकर सांगत आहेत. हामेद सलीम हे पंचायत समिती गणमधील कुठल्याही व्यक्तीच्या कामाला अर्ध्यारात्री देखील धावून येत असतात तसेच त्यांच्या स्वभावामुळे व काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांचे नेतृत्व हे जनतेला मान्य आहे. त्यामुळे यावेळेस नेकनूर पंचायत समिती गणमध्ये मतदार मोठा बदल करणार असून हामेद सलीम यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. यामुळे हामेद सलीम यांच्या विरोधकांना घाम फुटला आहे तरी  हामेद सलीम यांना उमेदवारी द्यावी जेणेकरुन नेकनूर करांचे प्रश्न मार्गी लागतील असे कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा